संगमनेर तालुक्यातील लोकांना भोकाडी दाखविण्याचे दिवस आता संपले...

आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी नाव न घेता राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांच्यावर टीका केली.
संगमनेर तालुक्यातील लोकांना भोकाडी दाखविण्याचे दिवस आता संपले...
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

संगमनेर ( जि. अहमदनगर ) - केंद्र सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बुथ सशक्तीकरण अभियानांतर्गत तालुक्यातील सर्व शक्तिकेंद्रपमुख आणि बुथप्रमुखांचा मेळावा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या मेळाव्यात बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी नाव न घेता राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांच्यावर टीका केली. ( Radhakrishna Vikhe Patil said that the days of showing hunger to the people of Sangamner taluka are over now ... )

मेळाव्यात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील पक्षसंघटनेचा आढावा घेतानाच सर्व शक्तिकेंद्रप्रमुख आणि बुथप्रमुखांना आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बूथप्रमुख म्हणून करावयाच्या कामांच्या मार्गदर्शक सूचना केल्या. याप्रसंगी संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले, जावेदभाई जहागीरदार, सतीश कानवडे, राम जाजू, श्रीराज डेरे, सुधाकर गुंजाळ, हरीष चकोर, मेघा भगत, सुनीता कानवडे, सुदामराव सानप, डॉ.सोमनाथ कानवडे, वैभव लांडगे यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी माजी तळेगाव येथील माजी उपसभापती नामदेव दादा दिघे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे जेष्ठनेते डिग्रस गावचे सरपंच रखमाजी खेमनर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Radhakrishna Vikhe Patil
राणा दाम्पत्याला उद्देशून बाळासाहेब थोरात म्हणाले...

संगमनेर तालुक्यातील लोकांना भोकाडी दाखविण्याचे दिवस आता संपले आहेत. कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. न झालेल्या कामाचे प्रश्न गावात खंबीरपणे उभे राहून विचारा. कारण आजपर्यंत केंद्र सरकारने या तालुक्यासाठी 1274 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. राज्य सरकारचा यांच्याशी कोणताही संबंध नाही. केवळ केंद्राच्या निधीवर उड्या मारुन श्रेय लाटण्याचे प्रकार महाविकास आघाडीकडून सुरू झाले असल्याची टीका आमदार विखे पाटील यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, ज्यांनी कोविड संकटात संपूर्ण संगमनेर तालुका वाऱ्यावर सोडून दिला होता. तेच आता मोदी सरकारच्या लसीकरणाचे श्रेय घेत फिरत आहेत. संगमनेर तालुका राज्यात नेमका कोणत्या विषयात पुढे आहे वाळू माफीया, लॅण्डमाफीयांनी तालुक्यात उच्छाद मांडला आहे. प्रदुषित पाणी पाजण्यामध्येही संगमनेर तालुका प्रथम क्रमांक समजायचा का? असा खोचक सवाल करुन विखे पाटील यांनी केला.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मला आदित्य ठाकरे यांची कीव वाटते...

आता तालुक्यात भोकाडी दाखवायचे दिवस संपले आहेत. कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. गावागावामध्ये खंबीरपणे उभे राहून न केलेल्या कामांचे उत्तरही मागा. आपल्याला गावपातळीवर सक्षमपणे बूथप्रमुख उभे करायचे आहेत. दबावाला बळी पडणारे कार्यकर्ते नकोत, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil
सुजय विखे पाटील आणि माझे बोलणे झाले आहे; भविष्यात ते धनुष्यबाण हाती घेतील : नार्वेकरांची गुगली

केंद्र सरकारचे काम जनतेपर्यंत पोचवा

आमदार विखे पाटील म्हणाले, की केंद्रातील मोदी सरकारने देशातील जनसामान्यांसाठी 78 योजना सुरु केल्या आहेत. कोविड संकटातही केंद्राने राज्याला मदत केली. त्यामुळे आपला देश आत्मनिर्भरतेने पुन्हा उभा राहिला आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण देशभरात सुरु आहे. मात्र या योजनांचे समाजमाध्यमात मार्केटींग आपण कमी पडत आहे. महाविकास आघाडी सरकार रोज नवा विषय निर्माण करुन, जनतेला गुंतवून ठेवण्याचे काम करत आहे. कार्यकर्तेही सोशल मीडियावर या विषयावर टीका टिपन्नी करण्यात व्यस्त होतात. त्यामुळे केंद्रसरकारच्या योजनांचे श्रेय घेता येत नाही. यामध्ये बदल करुन येणाऱ्या काळात गावागावात जावून बूथ कमिटीच्या माध्यमातून केंद्र सरकारचे काम आणि दिलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात असे त्यांनी सुचित केले.

Radhakrishna Vikhe Patil
राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधीने नगर-मनमाड रस्त्याच्या कामात मागितली टक्केवारी : डॉ. सुजय विखे पाटील

बिल्डरांना लाभ दिला मग नागरिकांना का नाही?

राज्यसरकार फक्त आश्वासनं देत आहे मात्र कोणत्याही घोषणांची अंमलबजावणी सरकारकडून होत नाही. मागील अडीच वर्षांत शेतकऱ्यांना कवडीची मदत सरकार करु शकले नाही. हे सरकार बिल्डर लॉबी धार्जिने आहे. कोविड संपल्यानंतर मुद्रांक शुल्कामध्ये कपात करुन बिल्डरांना दिलासा दिला. मुंबईमधील नागरिकांना जसा कर सवलतीचा लाभ दिला तसा लाभ संगमनेरच्या व्यापारी आणि नागरिकांना इथल्या मंत्र्यांनी का मिळवून दिला नाही? ही गावे राज्यात नाहीत काय? केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्यांना सामान्य जनतेचा विसर पडला असल्याचा टोलाही आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in