
अहमदनगर - भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी ( ता. राहाता ) येथे पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ( Radhakrishna Vikhe Patil said that 'government sponsored' attacks on the opposition by the state government )
मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांना जीवे मारण्याच्या धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यावर आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, रोज आपण जे चित्र पाहत आहे त्यातून राज्यात कायद्याचा धाक उरलेला नाही हे अशा घटनातून स्पष्ट होते. विरोधकांवर 'गव्हरमेंट स्पॉन्सर' हल्ले झाल्याचे मुंबईच्या घटनेतून दिसत आहे. मुंबईचा प्रकार पाहिला तर तेथे शिवसेनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या संरक्षणात हल्ले करतात. अंडरवर्ल्डशी संबंधित असलेले नवाब मलिक यांच्या विरोधात पुरावे मिळूनही त्यांचे मंत्रीपद कायम ठेवले जाते. मग गुंडांचे बळ वाढणारच. शंकरराव गडाख हे महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार होतो. आज त्यांना स्वतः धमक्या यायला लागल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की, विरोधकांवर हल्ले होणे हे गव्हरमेंट स्पॉन्सर्ड होते. आता मंत्र्यालाच खुनाच्या धमक्या यायला लागल्या कारण त्यांनी जे पेरलेय तेच उगवणार. गुंडगिरीला कुठलीही जात, धर्म नसते. नेत्यांच्या घरावर हल्ले होतात. मंत्र्यांना खुनाच्या धमक्या येतात. मला कधीकधी शंका येते की हे गव्हरमेंट स्पॉन्सर आहे का? सरकारच्या रोजच्या अपयशातून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न नाही ना, अशी एक शंका येते. चौकशीची मागणी करावी तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या वाहनावर हल्ला झाला. यात ते जखमी झाले. हल्ले खोरांना ताब्यात घेण्या ऐवजी जखमीची चौकशी होऊ लागली आहे. सामान्य माणसाच्या मनातही भीतीचे वातावरण आहे.
राज ठाकरे यांच्या सभांपूर्वी लावण्यात आलेल्या जमावबंदी आदेशातवर आमदार विखे पाटलांनी सांगितले की, सरकार पारदर्शी असेल तर का घाबरत आहे. दोन-अडीच वर्षे दिवे लावले आहेत. जनता तुमच्या पाठीशी आहे, असे राज्यातील मंत्री वल्गना करतात. मग राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला परवानगी का देत नाहीत. त्यांची भीती का वाटायला लागली आहे. औरंगाबादला शिक्षकांचा मेळावा झाला. हजारो शिक्षक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसार गोळा केले होते. ते राज्य सरकारला चालते. राज ठाकरेंची सभा होणार म्हणताच राज्य सरकारने जमावबंदीचे आदेश लागू केले. सत्ता पक्षाच्या सभा करण्यासाठी जमावबंदी नाही. त्यांनी कितीही मुसकाट दाबीचा प्रयत्न करा. शेवटी भारतातील जनता हे सगळे ओळखून आहे. महाविकास आघाडीचे पापाचे घडे भरले आहेत. कोणाचा भोंगा, कोणाचा दंगा यावर चर्चा होत आहे. त्यांच्या भोंग्यातून आवाज निघणे बंद झाले आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्याचे भोंगे ऐकण्याची इच्छा राहिलेली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांनी मास्क काढण्याची गरज आहे. महाराष्ट्राने त्यांना दोन वर्षे पाहिलेले नाही. राज्याच्या राजकीय वाटचालीत पहिल्यांदा मुख्यमंत्री घरात बसून आहेत. ते मास्क काढणार असतील तर त्यांचे आम्ही स्वागत करतो. त्यांनी मास्क काढल्यावर त्यांच्या सरकारचे खरे चित्र काय आहे हे त्यांनाच पहायला मिळणार आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या मंत्र्यांचा पहिल्यांदा समाचार घ्यावा लागेल. जनतेने पुष्कळ संयम धरला आहे. ही जनता त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, असे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.