भरकटलेले जहाज आणि बेताल वक्तव्य करणारे प्रवक्ते एवढीच शिवसेना आता शिल्लक

भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी भाष्य केले आहे.
Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar Latest Marathi News
Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar Latest Marathi NewsSarkarnama

अहमदनगर - राज्यातील शिवसेनेत फुट पडल्याने महाविकास आघाडीची सत्ता गेली आहे. शिंदे गट व भाजपने राज्यात सत्ता मिळविली. या घटनाक्रमावर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेले 15 पैकी अनेक आमदार तसेच 12 हुन अधिक खासदार सुद्धा बाहेर पडतील असा दावा भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. तर भरकटलेले जहाज आणि बेताल वक्तव्य करणारे प्रवक्ते एवढीच शिवसेना आता शिल्लक राहिली असल्याचा टोला देखील विखे पाटलांनी संजय राऊतांच नाव न घेता लगावला. ( Radhakrishna Vikhe Patil said, Shiv Sena is now left with only stray ships and spokespersons who make absurd statements. )

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील 40 आमदार त्यांच्या गटात सामिल झाले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ 15 आमदार असून अनेक खासदार देखील शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आम्हीच खरी शिवसेना असा दावा दोन्ही बाजूकडून होत असल्याने शिवसेनेत उभी फूट पडल्याचे चित्र आहे. भाजपने चाणाक्ष खेळी करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंचे टेन्शन आणखी वाढवणारे वक्तव्य केले आहे.

Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar Latest Marathi News
Video: अजितदादांनी पुन्हा आमच्या सोबत यावे; राधाकृष्ण विखे पाटील

शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पुढील काही महिन्यातच मध्यावधी निवडणुका लागतील असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी केला आहे. विखे पाटलांनी मात्र हा दावा फेटाळून लावत मध्यावधी निवडणुकीची विधाने नैराश्यातून येत असल्याचे त्यांनी म्हंटल आहे.

Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar Latest Marathi News
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच केंद्र सरकारच्या योजनांचे श्रेय घेतेय

राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचे बोलले जात आहे. या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी राज्य काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. यावरून विखे पाटलांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसमध्ये आता कोणावर कारवाई करणार? थोडेफार शिल्लक आहेत ते तरी पक्षात राहिले पाहिजे असा टोला विखे पाटलांनी लगावला.

आता विचाराचे आणि विकासाच सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार अडीच वर्षात जनतेचा विश्वास संपादन करणार आहे. आघाडीने अधोगतीला नेलेल राज्य आता विकासाकडे जाणार यात शंका नाही, असा विश्वास आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com