राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मला आदित्य ठाकरे यांची कीव वाटते...

आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) व खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर टीका केली.
Radhakrishna Vikhe Patil Latest News, Sanjay Raut News, Aditya Thackeray News
Radhakrishna Vikhe Patil Latest News, Sanjay Raut News, Aditya Thackeray NewsSarkarnama

अहमदनगर - राहाता येथे इफ्तार पार्टी निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी शिवसेनेचे युवा नेते तथा मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) व खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर टीका केली. ( Radhakrishna Vikhe Patil said, I feel pity for Aditya Thackeray ... )

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्त्वाची भूमिका होती. ज्या पद्धतीने त्यांनी हिंदुत्त्वाचा पुरस्कार केला, त्यामुळे समाजात त्यांच्या बद्दल लोकांच्या मनात आदर आहे. त्यांनी सत्तेसाठी विचारांशी तडजोड केली नाही. मात्र आज शिवसेना सत्तेसाठी विचारांशी जी तडजोड करत आहे, असा टोला त्यांनी लगावला. (Radhakrishna Vikhe Patil Latest News)

Radhakrishna Vikhe Patil Latest News, Sanjay Raut News, Aditya Thackeray News
'मातोश्री' गिफ्ट प्रकरणावर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोलले अन् म्हणाले...

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचे प्रवक्ते रोज जे विधान करत आहेत. ते शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपविण्यासाठीच रोज बोलत आहे. अयोद्ध्येच्या वक्तव्या बाबत मला आदित्य ठाकरे यांची कीव वाटते. राजकारणात ते नवीन आहेत. त्यांनी अजून राजकारणात बरेच शिकायचे आहे. त्यांनी चांगल्या लोकांकडून चांगले धडे घ्यावेत. राज ठाकरे अयोद्ध्येत चालले म्हणून मी आधी अयोद्ध्येत जाणार असे करून हिंदुत्त्व सिद्ध होत नाही. तुम्ही सत्ता टिकविण्यासाठी ज्या तडजोडी केल्या आहेत. या बाबत राज्यातील जनता शिवसेना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही, असे आमदार विखे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com