राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकलायं...

श्रीरामपूर ( Shrirampur ) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी शिबिराचे उद्धाटन आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( MLA Radhakrushn Vikhe Patil ) यांच्या हस्ते आज करण्यात आले.
 MLA Radhakrushn Vikhe Patil
MLA Radhakrushn Vikhe PatilSarkarnama

अहमदनगर : श्रीरामपूर ( Shrirampur ) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी शिबिराचे उद्धाटन आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( MLA Radhakrushn Vikhe Patil ) यांच्या हस्ते आज करण्यात आले. या प्रसंगी आमदार विखेंनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी आमदार विखे यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता गंभीर आरोप केले. Radhakrishna Vikhe Patil said, a big minister in Nagar district is involved in corruption ...

महसूल मंत्री थोरात यांनी संगमनेर येथे एका कार्यक्रमात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता आरोप केले होते. यावर पत्रकारांनी विचारले असता विखे म्हणाले, त्यांना व काँग्रेसला राज्य सरकारमध्ये किती किंमत आहे. हे लोकांनी पाहिलेले आहे. त्यामुळे ज्यांना पक्षात व सरकारमध्ये किंमत नाही त्यांच्या वक्तव्याबद्दल मी काय बोलणार, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

 MLA Radhakrushn Vikhe Patil
विखे - थोरात संघर्ष मोठा, तरीही खासदार विखे हे थोरातांना मुलासारखेच !

विखे पाटील पुढे म्हणाले, संपूर्ण राज्यभरात महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराला लोककंटाळलेले आहेत. मंत्री व दलालांचे साटेलोटे रोज समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री त्यात अडकलेला आहे. प्रकरण ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी लोकांच्या लक्षात येईल. चौकशी सुरू आहे. ते ईडी, सीबीआय वर आरोप करतील. वास्तविक पाहता या मंत्र्यांची सर्व पापे भरलेली आहेत. आपली पापे झाकण्यासाठी स्वायत्त संस्था असलेल्या ईडी, सीबीआय सारख्या संस्थांवर दोषारोप चालू आहे. कारण या संस्था बदनाम करायच्या म्हणजे आपला भ्रष्टाचार लपविता येईल, या भ्रमात मंत्र्यांनी राहू नये. हा माझा त्यांना सल्ला आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले

यावर पत्रकारांनी मंत्री हा नवा आहे की जुना असे विचारले असता आमदार विखे पाटील म्हणाले, सध्या या प्रकरणावर सबुरीने घ्या म्हणजे लवकरच मंत्री नवीन आहे की जुने हे कळेल. कोणी किती 'महसूल' गोळा केला. हे आपोआप समोर येईल, असेही आमदार विखे पाटील यांनी सूचित केले.

 MLA Radhakrushn Vikhe Patil
राज्य सरकारने मांडलेय भ्रष्टाचाराचे मेनूकार्ड - आमदार राधाकृष्ण विखे पाटील

सर्व नगरपालिका ताकदीने लढविणार

जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. यावर भाजपची भूमिका मांडताना आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, भाजप संपूर्ण ताकदीनिशी सर्व नगरपालिकांच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीरामपूर नगरपालिकाही आम्ही पूर्ण ताकदीने लढविणार आहोत, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com