राधाकृष्ण विखे पाटलांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी भाजप नेत्याचे विठ्ठलाला साकडे

भाजपचे युवा नेते राहुल शिंदे यांनी ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी विठ्ठलाला साकडे घातले.
Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar News
Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar NewsParesh Kapse

अहमदनगर - आषाढी एकादशी निमित्त काल ( रविवारी ) अनेक भाविकांनी विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतले. यात मुख्यमंत्र्यांपासून वारकऱ्यांपर्यंत अनेकजण होते. मात्र यंदाच्या आषाढी एकादशीमध्ये विठ्ठलाला राजकीय साकडे घातले गेले. शिवसेनेच्या बंडखोर मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यांच्याबाजूनेच लागावा यासाठी साकडे घातले तर भाजपचे युवा नेते राहुल शिंदे यांनी ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी विठ्ठलाला साकडे घातले. Radhakrishna Vikhe Patil News Update

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात हा विखे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत आहेत. पारनेर तालुक्यातील प्रती पंढरपूर म्हणून पळशी येथील विठ्ठलाचे मंदिर ओळखले जाते. या मंदिरात भाजपचे नेते राहुल शिंदे यांनी काल (रविवारी) दर्शन घेऊन राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यातील कॅबिनेट मंत्री व्हावेत असे साकडेच विठ्ठलाला घातले.

Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar News
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच केंद्र सरकारच्या योजनांचे श्रेय घेतेय

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रीपद मिळावे अशी विखे समर्थकांची इच्छा आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव आघाडीवर होते मात्र विखे पाटील यांनीच या पदाला नकार दिल्याची आहे. विखे पाटील यांनी मागील महिन्यात एका कार्यक्रमात मला जलसंपदा अथवा त्या समान मंत्रीपद मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar News
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मला आदित्य ठाकरे यांची कीव वाटते...

राहुल शिंदे यांनी पळशीच्या विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील विकासकामांत विखे कुटुंबाचे मोठे योगदान आहे. राज्यात आलेल्या नवीन सरकारमध्ये चांगल्या दर्जाचे खाते तसेच कॅबिनेट मंत्रीपद विखे पाटील यांना मिळावे. त्या माध्यमातून त्यांच्या हातून सर्वसामान्य जनतेची सेवा व्हावी. त्यांना लवकरच कॅबीनेट मंत्रीपद मिळेल. ते अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com