विखे पॅटर्नची राज्यभर चर्चा : अशी केली शेतकऱ्यांना मदत

आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी त्यांच्या आमदार निधीतून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama

अहमदनगर - राज्यात पावसाळा लांबला आहे. राज्यात राजकीय गोंधळ सुरू आहे. यातच महावितरण कंपनीचे काही रोहित्र बंद पडल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. हे पाहता भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी त्यांच्या आमदार निधीतून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ( Radhakrishna Vikhe Patil gave relief to the farmers )

वीज वितरण कंपनीकडून बंद पडलेले रोहित्र मिळण्‍यास होणारा विलंब लक्षात घेवून आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी रोहीत्रांसाठी आमदार निधीतील दोन कोटी रुपये देण्‍याची केवळ घोषणा न करता त्‍याची अंमलबजावणी सुरु केल्‍याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वीज टंचाईवर मात करताना आमदार विखे पाटील यांचा पॅटर्न आता राज्‍यात लक्षवेधी ठरत आहे.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच केंद्र सरकारच्या योजनांचे श्रेय घेतेय

रोहित्रांच्‍या समस्‍यांमुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना विजेच्‍या प्रश्‍नाला सामोरे जावे लागत आहे. कधी बिलांच्‍या कारणाने तर कधी जळालेले रोहित्र वेळेत न मिळाल्‍याने शेतकऱ्यांची आंदोलने मध्‍यंतरी मोठ्या प्रमाणात सुरु झाली. वीज वितरण कंपनीकडूनही या प्रश्‍नाबाबत कोणताही दिलासा मिळत नसल्‍याने राहित्रांबाबतच्‍या अडचणी आमदार विखे पाटील यांच्‍या जनता दरबारात सातत्‍याने येवू लागल्‍या. यामध्‍ये कायमस्‍वरुपी तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्‍याचा नवा पॅटर्नच यानिमित्‍ताने पुढे आला.

दरवर्षी शासनाकडून मिळणारा आमदार निधी रस्‍ते किंवा इतर विकास कामांसाठी उपयोगात आणला जातो. ही सातत्‍याने सुरु राहणारी प्रक्रीया आहेच, परंतू ग्रामीण भागातील जीवन विजेवरच अवलंबून असल्‍याने विजेच्‍या प्रश्‍नात कायमस्‍वरुपी उत्‍तर शोधण्‍यासाठी आमदार विखे पाटील यांनी आपल्‍या आमदार निधीतून दोन कोटी रुपये फक्‍त रोहीत्रांसाठी उपलब्‍ध करुन देण्‍याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला, याची अंमलबजावणी सुरु झाली. आत्‍तापर्यंत 4 रोहित्र मंजूर करुन, त्‍यांना शेतकऱ्यांना दिलासाही दिला. अशा पध्‍दतीचा निर्णय करणारा शिर्डी मतदार संघ हा राज्‍यात एकमेव ठरला आहे.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मला आदित्य ठाकरे यांची कीव वाटते...

राहाता तालुक्‍यात मागील तीन वर्षांपासून पर्जन्‍यमान चांगले असल्‍याने शेतकरी चांगल्‍या पध्‍दतीची पिक घेत आहेत. मात्र विजेअभावी पिकांना पाणी मिळत नसल्‍याने शेतकऱ्यांपुढे हतबल होण्‍याची वेळ येते. असलेल्‍या रोहित्रांवरही जादा भार येत असल्‍याने राहित्र बंद पडण्‍याच्‍या समस्‍याही वाढल्‍या होत्‍या. बंद पडलेले रोहित्र वीज वितरण कंपनीकडून वेळेत मिळत नाही. आवश्‍यकता असेल ति‍थे नवीन रोहीत्र उभे करण्‍यासाठीही या निधीचा विनीयोग होणार आहे.

अडचणीत सापडलेल्‍या शेतकऱ्यांना दिलासा देण्‍यासाठी आमदार विखे पाटील यांनी मतदार संघात उचललेले पाऊल महत्‍वपूर्ण ठरले आहे. या निर्णयामुळे खरीप हंगामाच्‍या सुरवातीलाच वीज टंचाईवर मात करण्‍याचा नवा पॅटर्न शिर्डी मतदार संघात सुरु झाल्‍याने आमदार विखे पाटील यांनी सुरु केलेल्‍या उपक्रमाचे शेतकऱ्यांकडून स्‍वागत होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com