Vikhe Patil on Sharad Pawar : राधाकृष्ण विखे पाटलांची पवारांवर खोचक टीका; म्हणाले, अभ्यास करून..

Radhakrishna Vikhe Patil News : ''शरद पवार हे माजी कृषीमंत्री आहेत. त्यांनी अनेक...''
Radhakrishna Vikhe Patil and Sharad Pawar
Radhakrishna Vikhe Patil and Sharad PawarSarkarnama

Solapur Nees : दुग्धजन्य प्रदार्थ आयात करण्याप्रकरणी केंद्र सरकाला शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रावरून भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

''शरद पवार हे माजी केंद्रीय कृषी मंत्री राहिले आहेत. त्यांनी कोणतेही विधान करताना वस्तुस्थितीची माहिती घेऊन विधान करावे'', असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

केंद्र सरकार परदेशातून काही दुग्धजन्य प्रदार्थ आयात करणार असल्याचे वृत्त वृत्तपत्रामध्ये आले होते. त्या बातमीचा आधार घेऊन शरद पवार यांनी चिंता व्यक्त करत केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. या निर्णयामुळे दुध उत्पादक शेतकरी आणि सकंलन केंद्र अडचणीत येतील, हा निर्णय केंद्र सरकारने बदलावा, असं पवारांनी पत्रात म्हटलं होतं.

Radhakrishna Vikhe Patil and Sharad Pawar
Pune Market Committee Election : महाआघाडीचे काही कार्यकर्ते विरोधकांना मिळाले अन्‌ राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाने दिली ताकीद...

या पार्श्वभूमीवरच बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ''शरद पवार हे माजी कृषीमंत्री आहेत. त्यांनी अनेक वर्ष कृषीमंत्रीपद संभाळलेले आहे. त्यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन बोललं पाहिजे. केंद्र सरकारने बटर आणि तुप आयात करण्याचा निर्णय आद्याप घेतलेला नाही. तर तसा विचार सुरू आहे'', असं ते यावेळी म्हणाले.

Radhakrishna Vikhe Patil and Sharad Pawar
Shinde Ayodhya Tour : मुख्यंमत्री शिंदेंच्या हस्ते होणार शरयू नदीची महाआरती; पदाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा

''राज्यामध्ये 70 टक्के दुध खासगी तर 30 टक्के सरकारी संस्थामध्ये संकलन केले जाते. यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. लगेच उत्पादक शेतकरी यांच्यावर परिणाम होणार हे शरद पवार यांचे विधान वास्तावाला धरून नाही. केंद्र सरकार असा निर्णय घेणार असेल तर राज्य शासनाच्यावतीने केंद्र सरकारला विनंती करून विचारपूर्वक निर्णय घ्यावा, अशी मागणी आपण करणार आहे'', असं ते म्हणाले.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com