Radhakrishna Vikhe Patil : खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilParesh Kapse

Radhakrishna Vikhe Patil : मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. ते निश्‍चित शिवसैनिकांना योग्य दिशा देतील. शिवाजी पार्कला होणारा मेळावा हा विचारधारा आणि शिवसैनिक शिल्लक नसलेल्यांचा होणार आहे, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : मागील अडीच वर्षात राज्याचा विकास 25 वर्षांनी मागे गेला

विखे म्हणाले, की माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वक्तव्य केले होते, की एकनाथ शिंदे हे यापूर्वीच मुख्यमंत्रिपदासाठी आमदारांना फोडून काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करण्यास तयार होते. त्यावेळी आपण काँग्रेस पक्षामध्ये होतो. आपल्यापर्यंत हा विषय आलेला नव्हता. त्यामुळे आपण या विषयावर बोलू शकत नाही. दसरा मेळाव्यात खऱ्या शिवसैनिकांना निश्‍चित दिशा मिळेल.

दुधाला मध्यंतरी भाव कमी होते. त्या काळात प्रतिलिटर अनुदान दिले होते. काही दूध संघांनी हे अनुदान हडप केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. दुग्धविकास आयुक्तांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : जमीन वाटपात गैरव्यवहार करणाऱ्यांना सोडणार नाही

जिल्हा शासकीय रुग्णालयाला आग लागण्याच्या घटनेला ऑक्टोबरमध्ये एक वर्ष पूर्ण होत आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली केलेल्या चौकशी अहवालावरील कार्यवाहीकडे लक्ष वेधले असता, हा अहवाल मागवून, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याबाबत काळजी घेतली जाईल. जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्याबाबत पुढील आठवड्यात माहिती देण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.

शिर्डीत फुले विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिली जाईल. सर्वसंमतीने त्याबाबत निर्णय घेतला जाईल. वीज उपकेंद्रांची क्षमता वाढविली जाईल, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in