Satara : साताऱ्यातही 'काँग्रेस छोडो' अभियान...

डिसेंबरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यावेळी सुद्धा राजकीय प्रवेश घेतले जाणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
BJP MLA Jaykumar Gore
BJP MLA Jaykumar Goresarkarnama

सातारा : जिथे जिथे भारत जोडो यात्रा जाते, तिथे तिथे काँग्रेसचे कार्यकर्ते यात्रेनंतर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. सातारा जिल्ह्यातही काँग्रेस छोडो अभियान सुरू होत असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येत्या 11 नोव्हेंबरला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. याची माहिती देण्यासाठी आमदार गोरे यांनी येथील विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली आहे. यायात्रेविषयी आमदार गोरेंना विचारले असता ते म्हणाले, जिथे जिथे भारत जोडो यात्रा जाते. तिथे तिथे काँग्रेसचे कार्यकर्ते यात्रेनंतर भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

सातारा जिल्ह्यामध्ये ही काँग्रेस छोडो अभियान सुरू होत असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भिमराव दादा पाटील, किरण बर्गे, अविनाश धायगुडे हे त्यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये फलटण, माण, खटाव या तालुक्यातूनही राजकीय प्रवेश होणार आहेत. येत्या डिसेंबरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यावेळी सुद्धा राजकीय प्रवेश घेतले जाणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

BJP MLA Jaykumar Gore
Khatav : खटावचा दुष्‍काळाचा कलंक पुसण्‍यासाठी झटतोय... जयकुमार गोरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in