कै. पोळ तात्यांच्या वारसदारांतच लढत; थोरल्याची जीत, धाकट्याची हार...

किंगमेकर कै. सदाशिवराव पोळ Sadashivrao Pol यांचे दोन सुपूत्र डॉ. संदीप पोळ Sandip Pol व मनोज पोळ Manoj Pol यांच्यात सोसायटी Society Election निवडणुकीच्या निमित्ताने समोरासमोर लढाई झाली.
Dr.Sandip Pol, Manoj Pol
Dr.Sandip Pol, Manoj Polsarkarnama

दहिवडी (ता. माण) : अतिशय लक्षवेधी ठरलेल्या कै. सदाशिवराव पोळ (तात्या) विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मार्डी या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. संदीप पोळ यांच्या पॅनेलने सात तर मनोज पोळ यांच्या पॅनेलने सहा जागांवर विजय मिळवला. तात्यांच्या वारसदारांच्यात झालेल्या या अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीत थोरल्याने बाजी मारली तर धाकट्याला हार पत्करावी लागली.

प्रथमच किंगमेकर कै. सदाशिवराव पोळ यांचे दोन सुपूत्र डॉ. संदीप पोळ व मनोज पोळ यांच्यात सोसायटी निवडणुकीच्या निमित्ताने समोरासमोर लढाई झाली. या निवडणूकीत डॉ. संदीप पोळ यांचे लोकनेते कै. सदाशिवराव पोळ शेतकरी विकास पॅनेल विरुध्द मनोज पोळ यांचे राष्ट्रवादी पुरस्कृत लोकनेते कै. सदाशिवराव पोळ सहकार पॅनेल अशी थेट लढत झाली. संचालक पदाच्या तेरा जागांसाठी रविवार (ता. सहा) चुरशीने १११६ पैकी ९७४ मतदान झाले होते. मतदान झाल्यानंतर लगेच मतमोजण झाली. मतमोजणीत आश्चर्यजनक निकाल समोर आले.

Dr.Sandip Pol, Manoj Pol
रणजितसिंह निंबाळकरांचे प्रयत्न; माण, खटावच्या १८१ गावात मिळणार नळाद्वारे पाणी...

सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघातून आठ संचालक निवडून द्यायचे होते. या मतदारसंघात डॉ. संदीप पोळ पॅनेलच्या डॉ. विद्या काळे, जयश्री पोळ, योगेश पोळ, रविंद्र पोळ, वर्षा पोळ हे तर मनोज पोळ पॅनेलच्या नंदकुमार पोळ, नानासाहेब पोळ, राजेंद्र पोळ हे विजयी झाले. या मतदारसंघात डॉ. विद्या काळे या सर्वात जास्त ५०७ मते घेवून विजयी झाल्या. महिला राखीव मतदारसंघात दोन्ही पॅनेलच्या प्रत्येकी एक डॉ. भारती पोळ व निलिमा पोळ या विजयी झाल्या. विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग या मतदारसंघातून ब्रम्हदेव नारनवर तर इतर मागासवर्गीय मतदारसंघातून शिवाजी गायकवाड हे विजयी झाले. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून दिनेश सावंत हे विजयी झाले.

Dr.Sandip Pol, Manoj Pol
देशमुखांची संपत्ती आता रडारवर...जयकुमार गोरेंचा इशारा

महिला राखीव मतदारसंघातून विद्यमान जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पोळ या सोसायटी निवडणुकीत सर्वात जास्त ५४५ मते घेवून विजयी झाल्या. तर त्यांच्याच गटाच्या कृष्णाबाई देशमुख यांना फक्त ४०६ मते मिळाली. आश्चर्य म्हणजे याच मतदारसंघातून विरोधी गटाच्या निलिमा पोळ या ४२४ मते घेवून विजयी झाल्या.

Dr.Sandip Pol, Manoj Pol
माण बाजार समितीवर आमदार जयकुमार गोरे यांचे एकहाती वर्चस्व      

मार्डीचे मतदार लय हुशार

सोसायटी निवडणूकीत शक्यतो एकच पॅनेल निवडून येते. अपवादात्मक ठिकाणी विरोधी पॅनेलची एखादी-दुसरी जागा निवडून येते. मात्र मार्डीत अतिशय वेगळा निकाल पहायला मिळाला. डॉ. संदीप पोळ पॅनेलला सात तर मनोज पोळ पॅनेलला सहा जागा मिळाल्या. या निकालाची सर्वत्र चर्चा सुरु होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com