नेवाश्यात भाजपला पुन्हा दे धक्का : मुरकुटेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

पुन्हा भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
नेवाश्यात भाजपला पुन्हा दे धक्का : मुरकुटेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
Shankarrao GadakhSarkarnama

सोनई ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्हा परिषद, नेवासे पंचायत समिती व नगरपालिकेची निवडणूक जशी जवळ येत आहे तसे शिवसेनेतील पक्ष प्रवेश वाढू लागले आहेत. यात भाजपमधून शिवसेनेत येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. पुन्हा भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांच्या उपस्थितीत काल ( शनिवारी ) शिवसेनेत प्रवेश केला. ( Push the BJP again in Newasa: Murkute's activists join Shiv Sena )

नेवासे नगर पंचायत मधील 'भाजपा'चे विद्यमान नगरसेवक आणि असंख्य युवकांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची साथ सोडून जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले आहे. हा 'दे धक्का' जिव्हारी लागणारा ठरत आहे.

Shankarrao Gadakh
शंकरराव गडाख म्हणाले, हा हल्ला म्हणजे मला राजकारणातून संपविण्याचा कट

अलीकडच्या तीन महिन्यांत मुरकुटे गटाचे अनेक प्रमुख कार्यकर्ते मंत्री गडाखांच्या कळपात दाखल होत आहेत. मुरकुटे यांचे गाव असलेल्या देवगावात शिवसेना प्रवेशाचे भूकंप झाल्याने ही गळती कशी रोखावी हा प्रश्न 'भाजप' गटाला सतावत आहे. घोडेगाव, कुकाणे, खरवंडी, सोनई येथेही पक्ष प्रवेशाचे बार उडत आहेत.

Shankarrao Gadakh
सुजय विखेंचा जवळचा कार्यकर्ता शंकरराव गडाख, औटी यांनी फोडला...

नेवासे नगरपंचायतीच्या प्रभाग चौदा मधील विद्यमान नगरसेवक राजेंद्र मापारी, युवानेते स्वप्नील मापारी यांच्यासह माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मापारी, भाजप युवा मोर्चाचे शरद पंडुरे, सोमेश मापारी, सागर पंडुरे, अनिकेत मापारी, गणेश चौधरी, तुषार परदेशी, अजय रासने, प्रवीण गायकवाड, समीर मापारी, प्रसाद मापारी, आशिष मापारी, गौरव राहुरकर, तेजस मापारी, शिवाजी शेजुळ, राहुल म्हस्के, अक्षय करंडे यांनी सोनई येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला.

Shankarrao Gadakh
मंत्री शंकरराव गडाख पारावरच्या गप्पात झाले दंग...

प्रवेश केलेल्या युवकांनी माजी आमदार मुरकुटे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. खालच्या पातळीवर राजकारण करुन सामाजिक अशांतता निर्माण करत असल्याने आम्ही विकास कामांना साथ म्हणून गडाख गटात आलो आहोत. नेवासे नगरपंचायतच्या माध्यमातून शहराचा कायापालट होत असल्याने आम्ही प्रभावित झालो असेही सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in