उदयनराजेंशी लढलेल्या पुरुषोत्तम जाधवांना आता विधान परिषदेचे वेध....

या १२ आमदारांच्या MLC यादीत List सातारा जिल्ह्यातून Satara District पुरूषोत्तम जाधव Purshottam Jadhav यांचे नाव भाजपमधून BJP पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या यादीकडे लागल्या आहेत.
Purshottam Jadhav
Purshottam Jadhavsarkarnama

सातारा : राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सेना व भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. आता या सत्ता बदलानंतर विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांच्या नियुक्तीही लवकरच होण्याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता असून दोन वेळा लोकसभा लढलेल्या पुरुषोत्तम जाधव यांचे नाव चर्चेत पुढे आहे. त्यांना संधी मिळाल्यास आणखी एक आमदार जिल्ह्याला मिळण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पाय उतार होऊन शिंदे गट व भाजपचे सरकार सत्तेत आले. त्यामुळे आता गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्त्याही लवकरच होण्याची चिन्हे आहेत. याबाबतची चर्चा सध्या सुरू आहे. या १२ आमदारांच्या यादीत सातारा जिल्ह्यातून पुरूषोत्तम जाधव यांचे नाव भाजपमधून पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या यादीकडे लागल्या आहेत.

Purshottam Jadhav
शशिकांत शिंदेंना धक्का; पुतण्या सौरभचा एकनाथ शिंदे गटाला पाठींबा...

पुरुषोत्तम जाधव यांनी 2009 ला शिवसेनेतून सातारा लोकसभेची निवडणूक लढली होती. त्यावेळी नवखे असतानाही त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात चांगली लढत दिली. त्यानंतर 2014 ला पुरुषोत्तम जाधव अपक्ष लोकसभा लढले आणि त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मत घेतली होती. 2019 च्या निवडणूकीत जोरदार तयारी करत शिवसेनेतून लोकसभेच्या रिंगणात उतरणार होते.

Purshottam Jadhav
साताऱ्याच्या दोन राजांना शशीकांत शिंदे दणका देणार?

मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहाने पुरुषोत्तम जाधव थांबले आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना संधी दिली गेली. त्यावेळी पुरुषोत्तम जाधव यांना दुसरीकडे संधी देऊ असे आश्वासन देण्यात आलं होतं. आता कुस्ती क्षेत्रातील श्री. जाधव यांचे काम बघून त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी दिली जावी, यासाठी हालचाली गतीमान झाल्या आहेत. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चाही झाली आहे. त्यामुळे पुरूषोत्तम जाधव यांच्या रूपाने साताऱ्याला आणखी एक आमदार मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in