पुरूषोत्तम जाधव झाले शिंदे गट शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख...

खासदार उदयनराजे MP Udayanraje Bhosale हे आमच्या युतीच्या Yuti पक्षाचे खासदार MP आहेत. त्यामुळे आमच्यात कोणताही वादविवाद Debate नाही.
Eknath shinde, Purushottam Jadhav
Eknath shinde, Purushottam Jadhavsarkarnama

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारच्या जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी आपल्यावर दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला सुरवात करून शिवसेनेचे संघटन वाढविण्यास प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यात शिंदे गट शिवसेना व भाजप युतीच्या माध्यमातून जिल्ह्यावर आगामी निवडणूकीत भगवा फडकविणार आहे, असे स्पष्ट मत शिंदे गटाचे नुतन जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी आज साताऱ्यात व्यक्त केले.

शिंदे गट शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर श्री. जाधव यांनी आज शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिंदे गट शिवसेनेच्या सातारा जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मी घेतली आहे. उद्या शिवसेनेच्या होणाऱ्या मेळाव्यात उर्वरित पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या करणार आहे. मंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

Eknath shinde, Purushottam Jadhav
एकनाथ शिंदेंना अजित पवार म्हणाले, कधी आपल्याला एकत्र यावे लागेल सांगता येत नाही...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर नव्याने जबाबदारी दिली आहे. जिल्हा प्रमुख म्हणून मला दुसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळाली आहे. शिंदे गटातील काहीजण नाराज आहेत का, याविषयी ते म्हणाले, माझ्याकडे वाई, खंडाळा, महाबळेश्वर, जावळी, सातारा व कोरेगाव तालुक्यांची जबाबदारी आहे. तसेच आमच्यात कोणीही नाराज नाही. नव्याने पदाधिकारी नेमणार असून ते जिल्ह्यात संघटनेचे काम पुढाकार घेऊन करतील.

Eknath shinde, Purushottam Jadhav
फडणवीस व ठाकरेंनी केलेल्या कर्जमाफीतून 70 टक्के शेतकरी वंचित : शेतकरी संघटनेचा आरोप

चंद्रकांत जाधव यांची ही जिल्हा प्रमुख होण्याची इच्छा होती. पण, त्यांच्यावर जिल्हा संघटक पदाची जबाबदारी दिली आहे. तसेच शरद कणसे यांच्यावर जिल्हा संपर्क प्रमुख जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असून मी नुकतीच उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. एमआयडीसीतील भूमिपुत्रांचे प्रश्न सोडविण्यासह जिल्हयात नवे उद्योग आणण्यावर आमचा भर राहणार आहे.

Eknath shinde, Purushottam Jadhav
Udayanraje Bhosale : जेव्हा उदयनराजे स्वतःच सांगतात खरी गोष्ट...

आगामी निवडणुकीसाठी शिंदे गट शिवसेना व भाजप युतीच्या माध्यमातून लढणार असून शिवसेनेची मूळ संघटना आमच्यासोबत आहे. यापुढे आम्ही ताकतीने पुढे जाणार आहे. जिल्ह्यातीलच मुखमंत्री असल्याने जास्तीत जास्त निधी आणला जाणार आहे. राष्ट्रवादीसह शिवसेनेतील काहीजण आमच्या संपर्कात असून आम्ही त्यांचे स्वागतच करणार आहोत. खासदार उदयनराजे हे आमच्या युतीच्या पक्षाचे खासदार आहेत. त्यामुळे आमच्यात कोणताही वादविवाद नाही. उलट त्यांची आगामी काळात आम्हाला मदतच होणार आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यावर भगवा फडकवू, असे ही श्री. जाधव यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com