Solapur : राम सातपुतेंचा आरोप अन् चंद्रकांत पाटलांची ग्वाही! सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची होणार उच्चस्तरीय चौकशी

Ram Satpute : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा प्रश्न आमदार राम सातपुते यांनी थेट विधानसभेत मांडला.
Ram Satpute
Ram Satpute Sarkarnama

Solapur News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध कामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला. त्यानंतर हा विषय आमदार राम सातपुते यांनी थेट विधानसभेत मांडला. त्यामुळे याची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.

राम सातपुते हे सभागृहात बोलताना म्हणाले, ''सोलापूर विद्यापीठामध्ये गेल्या पाच वर्षात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कुलगुरूंचा बायोडेटाच खोटा असून त्यांनी हा खोट बायोडेटा राज्यपालांना सादर केला आहे. या कुलगुरूंनी सोलापूर विद्यापीठाला ओरबाडण्याचं काम केलं आहे''.

''या कुलगुरूंच्या कालावधीत विद्यापीठात एकही नवीन अभ्यासक्रम सुरू झाला नाही. एकही मानांकन मिळालं नाही. सोलापूर विद्यापीठामध्ये कुलगुरूंनी पाच वर्षाच तब्बल 40 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे'', असा गंभीर आरोप सातपुते यांनी केला.

Ram Satpute
Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! मिळकत करात 40 टक्के सवलतीचा निर्णय

तसेच कुलगुरूंनी कशाप्रकारे घोटाळा केला याची आकडेवारी सातपुतेंनी सभागृहात सांगितली. सातपुते म्हणाले, ''एका ऑनलाईन पेपरला 35 रुपये तसेच सर्व्हरला 10 रुपये असे पैसे त्यांनी घेतले आहेत. अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टदाराला कॉन्ट्रॅक्ट दिलं''.

''सोलापूर विद्यापीठांमध्ये वर्षाला सत्तर हजार विद्यार्थी आहेत. त्यामुळे वर्षाला 8 कोटी आणि पाच वर्षात तब्बल 40 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्टाचार सोलापूर विद्यापीठामध्ये झाला आहे'', असा आरोप सातपुतेंनी केला.

Ram Satpute
Kolhapur news: कर्मचारी म्हणतात पेन्शन द्या; बेरोजगार तरुण म्हणतात पेन्शन नको काम द्या..

आमदार राम सातपुते यांनी थेट सभागृहातच कुलगुरूंवर गंभीर आरोप केल्यामुळे यावर उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय समिती स्थापन करून चौकशी करण्याची घोषणा केली. दरम्यान, आता या सर्व भ्रष्टाचाराच्या आरोपांवर विद्यापीठ प्रशासन काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com