सिनेट निवडणूकीपूर्वी ॲकेडमिक कौन्सिलचे 5 बिनविरोध; शिंदेसेना, 'सुटा' अभाविपत वाढणार चुरस

Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University Election| अर्थाने पदवीधर व शिक्षक या दोन मतदारसंघात चुरस पहायला मिळणार आहे.
Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University
Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट व विद्यापरिषद (ॲकेडमिक कौन्सिल) आणि अभ्यास मंडळाची निवडणूक सुरु आहे. त्या खऱ्या अर्थाने पदवीधर व शिक्षक या दोन मतदारसंघात चुरस पहायला मिळणार आहे. विद्यापरिषदेच्या आठपैकी पाच जागा आताच बिनविरोध झाल्या असून केवळ एकाच जागेसाठी निवडणूक होईल, अशी स्थिती आहे.

विद्यापरिषदेतून सध्या प्रा. डॉ. हणुमंत आवताडे, तानाजी कोळेकर, लक्ष्मी मुशान व शिवाजी शिंदे हे सुटाचे उमेदवार बिनविरोध होतील. वालचंद समुहाच्या आयेशा रंगरेज यांच्याविरोधात उमेदवारच नसल्याने त्या विजयी झाल्याची औपचारिक घोषणा बाकी आहे. दरम्यान, विद्यापीठ निवडणुकीतून महाविद्यालयांच्या प्राचार्यांनाही ‘सिनेट’वर संधी मिळते. पण, दहा जागांसाठी केवळ नऊ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे काही प्राचार्य व आरक्षणानुसार काही संस्थाचालक बिनविरोध झाले असून अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी ते चित्र स्पष्ट होणार आहे. शिक्षक मतदारसंघातून दहा जागांसाठी ३० अर्ज भरले गेले आहेत. त्यात सुटाचे दहा उमेदवार आहेत. पण, विद्यापीठाच्या सिनेटसह विद्यापरिषद व अभ्यास मंडळात प्राबल्य तथा बहुमत राखण्यासाठी ‘सुटा’ शेवटच्या क्षणी काहींची उमेदवारी रद्द करून संभाजी ब्रिगेड, युवासेनेला काही जागा देण्याचीही शक्यता आहे. या निवडणुकीत मागासवर्गीय शिक्षक संघटनेची भूमिका काय असणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University
Maratha Reservation : 19 सप्टेंबरला धडकणार मोर्चा

युवासेना-संभाजी ब्रिगेडची सुटासोबत चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केली. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेना ही संभाजी ब्रिगेडला सोबत घेऊन लढत आहे. सिनेटमध्ये एन्ट्री व्हावी म्हणून दोघांनीही प्रत्येकी दोन जागांची मागणी ‘सुटा’कडे केल्याची चर्चा आहे. पण, एक किंवा दोन जागा देण्याची तयारी ‘सुटा’ने दर्शविल्याचेही बोलले जात आहे. पुढील तीन दिवसांत त्यासंबंधी अंतिम निर्णय होईल, असे ‘सुटा’च्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

‘सुटा’कडून पाच जणांची उमेदवारी फिक्स

सिनेटमध्ये ‘पदवीधर’च्या दहा जागा आहेत. पण, त्याठिकाणी तब्बल बारापट म्हणजेच 76 अर्ज दाखल झाले होते. त्यातील आता 48 अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान, युवासेना, संभाजी ब्रिगेड, युवक राष्ट्रवादी, भारतीय विद्यार्थी सेना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह काहींनी पदवीधरसाठी अर्ज केले आहेत. या संपूर्ण निवडणुकीत ‘सुटा’चेच पारडे जड वाटत आहे. रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे, राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे यांची कन्या मंजुळा सपाटे, प्रा. सचिन गायकवाड व ॲड. गणेश पवार यांना ‘सुटा’ने उमेदवारी फिक्स केल्याचे बोलले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in