प्राध्यापकाचे फिरले माथे : पोलिसासह तीन जणांवर केला जीवघेणा हल्ला

अहमदनगर जिल्ह्यात आलेल्या प्राध्यापकाने पोलिसांसह तीन जणांवर जीवघेणा हल्ला करत जखमी केले.
Crime
CrimeSarkarnama

महेश माळवे

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - प्राध्यापक हे विद्वान व विचारपूर्वक निर्णय घेणारे समजले जातात. मात्र अहमदनगर जिल्ह्यात आलेल्या प्राध्यापकाने पोलिसांसह तीन जणांवर जीवघेणा हल्ला करत जखमी केले. या जखमींत त्याच्या पत्नीचाही समावेश आहे. या घटनेची जिल्हाभर चर्चा आहे. ( Professor turns his head: Fatal attack on three people including police )

विनोद मच्छिंद्र बर्डे (वय 41, रा. जीवन नाना पार्क, कोल्हापूर) असे प्राध्यापकाचे नाव आहे. शैला विनोद बर्डे (पत्नी, वय 36), जिल्हा परिषद शिक्षक किशोर शिवाजी शिंदे (वय 35, रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर), पोलिस संतोष रामकिसन बढे (वय 44) अशी जखमींची नावे आहेत.

Crime
बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणू...

कोल्हापूर येथील प्राध्यापकाने चितळी (ता.राहाता) येथे सासूरवाडीला प्रथम पत्नीच्या डोक्यात फरशी मारुन जखमी केले. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्यात एका शिक्षकावर व नंतर पोलिस कमर्चार्यावरही चाकूने वार करून जखमी केले. एका कमर्चार्याने प्रसंगावधान दाखविल्याने तो यातून बचावला. आज (सोमवारी) दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान हा घटनाक्रम घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मौनी विद्यापीठात (गारगोटी, कोल्हापूर) जीवशास्त्राचा प्राध्यापक असलेला विनोद बर्डे याचे 13 वर्षांपूर्वी चितळी येथील मामाची मुलगी शैला हिच्याबरोबर विवाह झाला. त्याला एक मुलगा, एक मुलगी आहे. दोन दिवसांपूर्वी सासुरवाडी चितळी गावात धामिर्क कार्यक्रमानिमित्त तो कुटुंबासह आला होता.

Crime
महसूल विभाग दोन तासांत ओबीसींचा कोणता डेटा गोळा करणार?

सासुरवाडीचे लोक मला विष देवून मारणार आहेत. म्हणून त्याने पोलिस व रुग्णवाहिकेला फोन केला. रुग्णवाहिकासमोर दिसताच त्याने शेजारी असलेल्या फरशीचा तुकडा पत्नी शैला हिच्या डोक्यात घालून जखमी केले. पत्नीला रूग्णवाहिकेत बसून दिले. दरम्यानच्या काळात त्याची आई ठाण्याहून आली. त्यांनी त्याला त्यांच्या गाडीत बसविले व श्रीरामपूरकडे निघाले असता त्याने पोलिस ठाण्यात घेऊन जाण्याची आग्रह धरला. त्यामुळे त्या त्याला घेऊन पोलिस ठाण्यात आल्या. येथे येताच त्याने चारित्र्यपडताळणीसाठी पोलिस ठाण्यात आलेले शिक्षक शिंदे यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात शिंदे यांच्या दोन्ही कानाला व पाठीला जबर जखम झाली आहे. पोलिस ठाण्यात असलेले पोलिस कमर्चारी बढे यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने बढे यांच्यावर चाकू हल्ला करून जखमी केले.

Crime
पुणतांब्याचे शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात : राज्य सरकारला सात दिवसांचा ‘अल्टीमेटम’

दरम्यान, दुसरे कमर्चारी ए. डी. पवार यांनी प्रसंगावधान दाखविल्याने ते हल्ल्यातून बचावले. त्यानंतर इतर कमर्चार्यांनी त्याला जेरबंद केले. हल्ल्यातील जखमींवर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीवरील हल्ल्याप्रकरणी तालुका, तर शिक्षक व पोलिस कमर्चारी हल्ल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in