माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या कारकिर्दीची चौकशी करा... आमदार गोरेंची केंद्राकडे मागणी

हमीद अन्सारी Hamid Ansari यांची उपराष्ट्रपतीपदावर नेमणूक करण्याच्या काँग्रेसच्या Congress निर्णयाचीदेखील चौकशी झाली पाहिजे, असेही आमदार गोरे Jaymumar Gore यांनी स्पष्ट केले आहे.
Jaykumar Gore, Hamid Ansari
Jaykumar Gore, Hamid Ansarisarkarnama

सातारा : काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर बसविलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नुसरत मिर्झा या पत्रकाराने केलेला गौप्यस्फोट गंभीर आहे. त्याचा देशाच्या सुरक्षिततेशी संबंध असल्याने अन्सारी यांच्या कार्यकाळाची आणि पाकिस्तानी हेराने दिलेल्या माहितीची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

अन्सारी यांच्यावरील वादग्रस्त आरोपांवर काँग्रेसनेही आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे सांगून आमदार गोरेंनी पत्रकात म्हटले की, २००७ ते २०१७ या काळात हमीद अन्सारी हे देशाचे उपराष्ट्रपती होते. याच काळात त्यांच्या निमंत्रणावरून भारतात पत्रकार या नात्याने दौरे करताना भारतातील महत्वाची गोपनीय माहिती हमीद अन्सारी यांच्याकडून मिळविल्याचा गंभीर गौप्यस्फोट नुसरत मिर्झा या पाकिस्तानी पत्रकाराने केला आहे.

Jaykumar Gore, Hamid Ansari
Video: रामराजेंनी राष्ट्रवादीला मान खाली घालायला लावली; जयकुमार गोरेंची टिका

एकदा दोनदा नव्हे, तर तब्बल पाचवेळा अन्सारी यांनी वेगवेगळ्या निमित्ताने मिर्झा यांना भारतात निमंत्रित केले होते. या भेटीत मिळविलेली माहिती आपण आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर एजन्सीला पुरवत होतो, असे मिर्झा यांनी म्हटले आहे. भारताच्या प्रत्येक शहरात पाकिस्तानी गुप्तहेरांचे जाळे पसरले असल्याचेही मिर्झा यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. त्यामुळे, मिर्झा आणि हमीद अन्सारी यांच्यातील संबंधांचा खुलासा होणे जरूरीचे असून त्यासाठी अन्सारी यांची चौकशी केली जावी.

Jaykumar Gore, Hamid Ansari
Video: भारत कधी पाकिस्तान बनू शकेल हे सांगता येत नाही; जितेंद्र आव्हाड

इराणचे राजदूत म्हणून देखील अन्सारी यांची कारकिर्द संशयास्पद असल्याचा आरोप केला जात असून देशाच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड न करता या आरोपांची तातडीने चौकशी होणे आवश्यक आहे. हमीद अन्सारी यांची उपराष्ट्रपतीपदावर नेमणूक करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचीदेखील चौकशी झाली पाहिजे.

Jaykumar Gore, Hamid Ansari
भाजपचा साधा कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यापेक्षा मोठा...जयकुमार गोरे

पत्रकात त्यांनी म्हटले की, देशाच्या सुरक्षिततेस बाधा येऊ शकेल अशी माहिती शत्रूराष्ट्रास पुरविण्याचा आरोप घटनात्मक पदावरील व्यक्तीवर होणे ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबतचे सत्य उजेडात आणले पाहिजे. तसेच त्या वेळी केंद्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेसने अन्सारी यांच्या नेमणुकीमागील भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in