कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरीचा मानकरी..

वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी महाराष्ट्र केसरीची Maharashtra Kesari गदा पटकाविण्याची किमया पृथ्वीराजने Prithviraj Patil साधली आहे
Prithviraj Patil
Prithviraj Patilsarkarnama

सातारा : कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने मुंबई पूर्वच्या विशाल बनकर याच्यावर पाच विरुद्ध चार गुणांच्या फरकाने विजय मिळवून महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आज आपले नाव कोरले. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी गदा पटकाविण्याची किमया त्याने साधली.

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब मैदान जिल्हा क्रीडा संकुलात झाली. अंतिम लढत पाहण्यासाठी प्रेक्षकांनी संकुलात खचाखच गर्दी केली होती. अंतिम फेरीत दोन तगडे पैलवान दाखल झाल्याने या लढतीत कोण बाजी मारणार, याची प्रेक्षकांतील उत्कंठा शिगेला पोचली होती. लढतीची वेळ पाच वाजता सांगण्यात आली असली तरी प्रेक्षक चार वाजता संकुलाच्या दिशेने येत होते.

Prithviraj Patil
दोन्ही राजे आमचेच...सातारा पालिकेचा निर्णय फडणवीस घेतील...

हलगी, घुमकं, कैताळच्या कडकडाटाने मैदानात उत्साह निर्माण केल्यानंतर संकुल काही वेळातच खचाखच भरले. अनुचित प्रकार कोठे होऊ नये, यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्तात प्रेक्षकांना संकुलात प्रवेश देण्यात आला. यावेळी मोहोळ कुटुंबियांकडून मानाची गदा संकुलात आणण्यात आली. याच वेळी महाबली सतपाल यांचे संकुलात आगमन झाले. प्रमुख मान्यवरांचे स्टेजवर आगमन झाल्यानंतर भाषणे सुरू झाली.

Prithviraj Patil
संजय पाटील यांच्या नावाने 'महाराष्ट्र केसरी'स एक लाखांचे बक्षिस

पावणे सात वाजले तरी लढत सुरू झाली नाही. त्यामुळे प्रेक्षकांतून टाळ्या व शिट्यांचा जोर वाढू लागला. अखेर सात वाजून दहा मिनिटांनी अंतिम लढत सुरू झाली. पहिली फेरी सुरू होताच डोळ्याचे पाते लवते न लवते तेवढ्यात दोन्ही पैलवान एकमेकांना भिडले. विशालने लपेट मारुन चार गुणांची कमाई केली. पृथ्वीराजने विशालला स्टेप आऊट करत एक गुण वसुल केला. या फेरीत विशालचे चार तर पृथ्वीराजचा एक गुण झाला.

Prithviraj Patil
महाराष्ट्र केसरी : किरण भगत बाहेर पडल्याने साताऱ्याला धक्का

दुसऱ्या फेरीत पृथ्वीराज काय करणार याची उत्सुकता दाटली. विशाल त्याचे डाव सफाईदारपणे परतवून लावत होता. पृथ्वीराजने गर्दन खेच करण्याचा प्रयत्न केला. तो विशालने धुडकावून लावला. दीड मिनिटांचा अवधी शिल्लक राहिला असताना पृथ्वीराज आक्रमक झाला. त्याने दुहेरी पटावर दोन गुण मिळवले. ही लढत ४ विरूद्ध ३ अशी झाल्याने पृथ्वीराजचे कसब पणाला लागले. जागतिक स्तरावरील अनुभवाचा त्याने पुरेपूर फायदा उठवत विशालवर बगल डूब टाकून दुहेरी पटावर ताबा घेतला. या डावावर त्याच्या खात्यात दोन गुण जमा झाले आणि लढत ५ विरूद्ध ४ या गुण फरकावर पोचली.

Prithviraj Patil
महाराष्ट्र केसरी म्हणतात, 'आम्हालाही आमदार करा...' 

विशालला बरोबरी साधण्यासाठी अखेरच्या बारा सेकंदात एक गुण आवश्यक होता. पृथ्वीराजने त्याला थोपवून धरले. निर्धारित वेळ संपल्याची शिटी पंचांनी वाजवताच प्रेक्षकांतून जल्लोष झाला. कोल्हापूरच्या समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करत संकुल दणाणून सोडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com