Karad : कराड, मलकापूरला शुद्ध पाण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा विधानसभेत आवाज

Prithviraj Chavan आमदार चव्हाण म्हणाले, साचून राहणाऱ्या पाण्यच्या ठिकाणी खड्डा पडतो त्यामुळे पाणी तिथेच अडकून राहते.
Prithviraj Chavan, Devendra Fadanvis
Prithviraj Chavan, Devendra Fadanvissarkarnama

Karad News : टेंभू योजनेच्या बंधार्‍यामुळे बॅक वॉटरची फुग कऱ्हाड शहर Karad City ते वारुंजीपर्यंत असते. ते पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने कऱ्हाड व मलकापूरला शुद्ध पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे टेंभूचे पाणी वरचेवर उपसा करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी आज विधानसभेत केली.

आमदार चव्हाण म्हणाले, साचून राहणाऱ्या पाण्यच्या ठिकाणी खड्डा पडतो त्यामुळे पाणी तिथेच अडकून राहते. तसेच कऱ्हाड व मलकापूर शहराचे सांडपाणी त्याच ठिकाणी सोडले जाते. वारुंजी जवळील भागात मलकापूर व कऱ्हाड नगरपालिका नदीतील पाणी उपसा करीत असते. पण, दोन्ही शहराचे सोडलेल्या सांडपाण्यामुळे व टेंभूचे पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने शहराला स्वच्छ पाणी मिळत नाही. काही वेळेला रोगराई सुद्धा पसरते.

पुराच्या वेळी पाणी अत्यंत खराब येत असल्याचे दिसते यामुळे वारुंजी येथे बंधार्‍याचे काम सुरू आहे ते जलद गतीने पूर्ण केले जावे जेणेकरून कोयना नदीचे स्वच्छ पाणी नगरपालिकेकडून उचलले जाईल व ते पाणी दोन्ही शहरांना मिळेल. टेंभू योजनेच्या फुगीचे पाणी वारुंजी बंधार्‍याच्या पुढे अडविले जाईल.

Prithviraj Chavan, Devendra Fadanvis
Satara Congress Andolan: राहूल गांधींना शिक्षेच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने

टेंभू योजनेमध्ये अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत. तसेच त्यांना पूर्ण मोबदला सुद्धा अजून मिळालेला नाही. तर अशा शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा. आमदार चव्हाण यांच्या या दोन्ही मागण्यांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारुंजी येथील प्रस्तावित बांधार्‍याचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती दिली. तसेच ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी टेंभू योजनेत गेल्या आहेत, त्यांना सुद्धा पूर्ण मोबदला देण्यासाठी शासन प्रयत्नशील असेल, अशी माहिती दिली.

Prithviraj Chavan, Devendra Fadanvis
Karad : रेल्वेमंत्री प्रभूंच्या हस्ते भूमिपूजन; तरीही कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळला कसा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com