Congress : या कारणांसाठी पृथ्वीराज चव्हाणांचा गेहलोत यांना विरोध...

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan म्हणाले, जो कोणी अध्यक्ष President होईल तो निवडणुकीच्या Election माध्यमातून व्हावा.
Prithviraj Chavan, Ashok Gehlot
Prithviraj Chavan, Ashok Gehlotsarkarnama

सातारा : आम्ही कधीच एका कुटुंबाच्या विरोधात नव्हतो. पण, जो कोणी काँग्रेसचा अध्यक्ष होईल, तो निवडणुकीच्या माध्यमातून व्हावा. पण, काँग्रेसला 'पार्ट टाइम' नव्हे, तर 'फुल्ल टाइम' अध्यक्षाची गरज आहे. अशोक गेहलोत जर एकाच वेळी काँग्रेस अध्यक्ष आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावर राहिले तर त्यांना आमचा विरोध राहिल, असे स्पष्ट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक तब्बल २४ वर्षांनंतर होत आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अध्यक्षपद न स्वीकारण्याची भूमिका घेतल्यामुळे ही निवडणूक होत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरूर यांच्यात थेट लढत होणार अशी शक्यता आहे. दरम्यान, गेहलोत यांनी पहिल्यांदाच यावर थेट भाष्य करून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केले आहे. तर, शशी थरूर यांनी आज आपला प्रतिनिधी पाठवून उमेदवारी अर्ज मागविला आहे.

Prithviraj Chavan, Ashok Gehlot
मोदींमुळेच 'वेदांता' गुजरातला गेला; डबल इंजिन सरकार गप्प का... पृथ्वीराज चव्हाण

त्यामुळे या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठी रंगत पहायला मिळणार आहे. मात्र, या सर्व हालचा सुरू झालेल्या असतानाच जी २३ गटातील नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठे विधान केले आहे. 'आम्ही कधीच एका कुटुंबाच्या विरोधात नव्हतो, पण..' काँग्रेसला पार्ट टाइम नव्हे, तर फुल्ल टाइम अध्यक्षाची गरज आहे. अशोक गेहलोत जर एकाच वेळी काँग्रेस अध्यक्ष आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावर राहिले तर आमचा विरोध राहिल, असे त्यांनी म्हंटलंय.

Prithviraj Chavan, Ashok Gehlot
राहूल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष होणार?: शरद यादव म्हणतात...

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जो कोणी अध्यक्ष होईल तो निवडणुकीच्या माध्यमातून व्हावा. राहुल गांधींना आजही निवडणूक लढवायची असेल आणि त्यांनी फॉर्म भरला तर आम्ही त्यांचं स्वागत करू. 'काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असावा' असे म्हणत श्री. चव्हाण यांनी सोनिया गांधींचेही आभार मानलेत. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असावा ही आमची मागणी पूर्ण झाली आहे. आता या निवडणूका पारदर्शीपणे व्हाव्यात, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. अशोक गेहलोत एक ज्येष्ठ नेते आहेत, चांगले नेते आहेत. त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे अजून ठरवायचं आहे. मात्र, त्यांना दोन्ही पदांवर कायम राहायचं असेल तर आमचा विरोध असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com