पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, चुकीच्या घटनांचे घडय़ाळ आता उलट फिरवणार आहे का?

Prithviraj chavan| न्यायालयाकडून निर्णय येऊ न शकल्याने सत्तासंघर्ष कायम राहणार आहे.
Prithviraj chavhan
Prithviraj chavhan

सांगली : राज्यातील सत्तासंघर्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची दिरंगाई अनाकलनीय आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. सांगलीत माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. राज्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने असून न्यायालयाकडून आजही निर्णय येऊ न शकल्याने सत्तासंघर्ष कायम राहणार आहे. सोमवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या या निर्णय प्रक्रियेवर पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

Prithviraj chavhan
Amaravti Politics : राणा दांपत्याला पुन्हा अटक होणार?

सर्वोच्च न्यायालयाचे काय चाललंय हेच कळत नाही. राज्यात घडलेल्या चुकीच्या घटनांचे घडय़ाळ आता उलट फिरवणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आज काहीतरी निकाल येईल असं अपेक्षित होतं. पण राज्यातील हा सत्तासंघर्ष फारच लांबलचक आणि गुंतागुंतीचा झाला आहे. निलंबनाची कारवाई झालेली नसताना नव्या मुख्यमंत्र्यांना शपथ देणे हेच चुकीचं होतं. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड ही देखील होऊन गेलेली आहे. पण आता या घटना पुन्हा मागे घेता येणार आहेत का, असंही त्यांनी विचारलं.

राज्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र न्यायालयाकडून कोणताही निर्णय होऊ शकला नाही. सुनावणीवेळी शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी १० व्या सूचीचा मुद्दा उपस्थित करत, पक्षांतरबंदी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही, असा युक्तिवाद केला. तर उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी, या प्रकरणांचा निकाल आपणच द्यावा, मोठ्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्याची गरज नाही, असं मत मांडलं. दोन्ही गटांच्या युक्तीवादानंतर न्यायायलान निवडणूक आयोगाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करु शकत नाही, असं सांगत पुढील सुनावणीपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याच्या सूचना केल्या. आता सोमवारी याप्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com