पृथ्वीराज चव्हाणांनी निधी दिला... पण अधिकाऱ्यांनी कऱ्हाड पाण्यात बुडेल अशीच व्यवस्था ठेवली...

राजकारणासहित Including politics दप्तर दिरंगाईचा फटका कराड Karad शहरालाच City बसणार आहे. बंदिस्त गटारांचे काम अपूर्ण Incomplete sewer work राहिल्याने पुन्हा पाणी साचून शहराला लाखोंचे नुकसान याही वर्षी सोसावे लागणार आहे.
पृथ्वीराज चव्हाणांनी निधी दिला... पण अधिकाऱ्यांनी कऱ्हाड पाण्यात बुडेल अशीच व्यवस्था ठेवली...
Karad palika, Prithviraj ChavanSatara Reporter

कऱ्हाड : कोरोनामुळे पालिकेच्या आर्थिक महसुलात घट झाली होती, कामांसाठी निधी नसतानाच्या काळात पावसाळ्यात साचून राहणाऱ्या पाणी निचऱ्यासाठी बंदिस्त गटार बांधणीला आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच कोटींचा निधी दिला होता. तो निधी अद्यापही वापराविना पडून आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये निधी वर्ग झाला असताना डिसेंबरपर्यंत सत्ताधाऱ्यांचे राजकारण तर डिसेंबरनंतर प्रशासक असूनही कराड पालिका अधिकाऱ्यांच्या राजकारणाचे पाच कोटींच्या निधीला ग्रहण लागले आहे.

राजकारणासहित दप्तर दिरंगाईचा फटका कराड शहरालाच बसणार आहे. बंदिस्त गटारांचे काम अपूर्ण राहिल्याने पुन्हा पाणी साचून शहराला लाखोंचे नुकसान याही वर्षी सोसावे लागणार आहे. पावसाळा आला की, शहरातील काही भागात पाणी साचून राहण्याचा प्रकार नित्याचाच होता. कोल्हापूर नाक्यावरून पोपटभाई पेट्रोलपंपासह शहर पोलिस ठाणे परिसर व भेदा चौक परिसराचा भाग कंबरे इतक्या पाण्यात असतो. तेथील गटारांची पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी असल्याने दरवर्षी नागरीकांचे लाखोंचे नुकसान होते.

 Karad palika, Prithviraj Chavan
Video : पृथ्वीराज चव्हाण हे कोणतेही आकडे शोधून आणतात : देवेंद्र फडणवीस

हद्दवाढीतील कार्वे नाका व अन्य भागात पावसाचे साचणारे पाणी घरात शिरते. तेथेही पाणी निचऱ्याची व्यवस्था नसल्याने तो धोका दरवर्षी पालिकेला पत्करावाच लागतो. शहरातील ती स्थिती लक्षात घेवून त्या भागातील पाणी निचऱ्याच्या व्यवस्थेसाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला. पालिका अहवालासह अधिकाऱ्यांची बैठक घेवून चर्चा केली. गटाराव्दारे बंदिस्त पाईपलाईन केल्यास पर्याय निघू शकतो, याची खात्री झाल्यानंतर त्यांनी निधी आणला. त्यातून गटारांची क्षमता वाढवण्याचे अपेक्षित होते.

 Karad palika, Prithviraj Chavan
माझी वसुंधरा पुरस्कारात कराड पालिका राज्यात दुसरी

मात्र, त्यातील काहीच काम झालेले नाही. बंदिस्त पाईपलाईनचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासबाब म्हणून मंजूर केला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला पाच कोटींचा निधी दिला. पालिकेत त्यातून कामे करण्याऐवजी राजकारणच सुरू आहे. त्यामुळे येथे पावसाच्या साचणाऱ्या पाण्यावर निघणारा तोडगा मागे पडला. पालिका अधिकाऱ्यांनीही केलेल्या राजकाणामुळे बंदिस्त गटारांचे काम मागे पडले.

 Karad palika, Prithviraj Chavan
स्वच्छ सर्वेक्षणात कराड, पाचगणी देशात अव्वल; सात शहरांना 'थ्री स्टार' रॅकिंग

निधी मंजूर होऊन नऊ महिने झाले आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात सत्ताधाऱ्यांच्या राजकारणामुळे निधी पडून राहिला. डिसेंबरपासून प्रशासक येवूनही पालिका अधिकाऱ्यांनाही निधी वापरण्याबाबत राजकारण केल्याने बंदिस्त गटाराचे काहीच काम झालेले नाही. राजकीय दबावापोटी पालिका अधिकारी हेतूपुरस्सर तो निधी वापरत नसल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in