काँग्रेस पक्ष सोडणार का, याबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं...

लोकशाही धोक्यात Democracy in danger आल्याने ती वाचवण्याचे काम काँग्रेसने केले पाहिजे. काँग्रेस पक्ष Congress हाच फक्त भाजपचा BJP मुकाबला करू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavansarkarnama

कऱ्हाड : मी काँग्रेस पक्ष सोडणार या बातम्या कोणी पेरल्या हे मला माहिती नाही. पण मी काँग्रेसच्या विचारांचा आहे, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडातील पत्रकार परिषेदत व्यक्त केले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराडात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वेदांता प्रकल्पावरून मोदी सरकार, राज्यातील डबल इंजिन सरकारवर टीकेची झोड उठवली. श्री. चव्हाण यांनी पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने ते काँग्रेस पक्ष सोडणार या चर्चेला उधाण आले होते. याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले, मी काँग्रेस सोडणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या हे मला माहित नाही. पण, मी काँग्रेसच्या विचारांचा आहे.

Prithviraj Chavan
मोदींमुळेच 'वेदांता' गुजरातला गेला; डबल इंजिन सरकार गप्प का... पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेस पक्षात पूर्णवेळ अध्यक्ष असावा, अशी मागणी मी ऑगस्ट २०२० मध्ये केली होती. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी ही मागणी मान्य केली होती. काँग्रेसमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणूका घेत निवडून आलेली माणसे असावित, नेमलेली माणसे नसावीत, अशी रोखठोक भूमिका मांडत काँग्रेस पक्ष मजबुतीसाठी योग्य भूमिका घेतली होती.

Prithviraj Chavan
साधूंना मारहाण करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते ; काँग्रेस साधू-संतांची माफी मागणार का ? भाजपचा सवाल

लोकशाही धोक्यात आल्याने ती वाचवण्याचे काम काँग्रेसने केले पाहिजे. काँग्रेसला बळकट झाली पाहिजे. काँग्रेस पक्ष हाच फक्त भाजपचा मुकाबला करू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. गोव्यातील काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, याविषयी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ती घटना दुर्दैव आहे. काश्मीरमधील सर्व लोक गेलेत. आता ही दुसरी घटना आहे. देशात हा पॅटर्नच सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

Prithviraj Chavan
स्वच्छ सर्वेक्षणात कराड, पाचगणी देशात अव्वल; सात शहरांना 'थ्री स्टार' रॅकिंग

पक्षांतरबंदी कायदा लागू...

शिंदे गट व भाजप यांचे सरकारबाबत दहाव्या परिशिष्टानुसार माझा जो अभ्यास आहे त्याप्रमाणे पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झालेले आहे. 16 आमदारांनी पक्षांतर बंदी कायदा लागू होतो असे तज्ञांचे मत आहे. त्याचा निर्णय पहिला होणे अपेक्षित आहे. मात्र, याला विलंब होतोय हे दुर्दैवी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com