Karad : पृथ्वीराज चव्हाणांच्या विकास कामांचे एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार उद्‍घाटन 

आमदार पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणेत Karad South विविध विकास कामे झाली आहेत. त्याचे उद्‍घाटन होत आहे.
Prithviraj Chavan, Eknath Shinde
Prithviraj Chavan, Eknath Shindesarkarnama

कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिणेतील विविध कामांचा उद्‍घाटनासह भूमिपूजन कार्यक्रम शुक्रवारी (ता. 25) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नातून दक्षिणेत विविध विकास कामे झाली आहेत. मुख्यमंत्री असतान व त्यानंतरही विकास कामे झाली. त्याचे उद्‍घाटन होत आहे. आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नातून प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालय झाले. तेही  लोकार्पण होत आहे. त्यासह विविध कार्यक्रम मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होत आहेत.

त्याचा आढावा आमदार चव्हाण यांनी घेतला.यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, इंद्रजीत गुजर, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, फारूक पटवेगार, प्रा.काटकर, इंद्रजीत चव्हाण, भानुदास माळी, झाकीर पठाण उपस्थित होते.

Prithviraj Chavan, Eknath Shinde
Sangali : देशाच्या विभाजनाचा मोदी सरकारचा डाव : पृथ्वीराज चव्हाण

आमदार चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण व नवीन शासकीय विश्रामगृहाचे उद्‍घाटन होणार आहे. कृष्णा नदीवरील रेठरे व पाचवडेश्वर ते कोडोली नवीन पुलाचे भूमिपूजन होणार आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधी स्थळावर श्रद्धांजलीचा कार्यक्रम तसेच कृषी प्रदर्शन उद्घाटनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते वरील कामांचे उद्‌घाटन व भूमिपूजन होणार आहेत.

Prithviraj Chavan, Eknath Shinde
सीमाप्रश्नी मंत्र्यांची समिती नेमताच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिला एकनाथ शिंदेंना हा अनाहूत सल्ला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com