बुलेट ट्रेनचा पांढर हत्ती; मंजुरीपूर्वीच खर्च 75 टक्क्यांनी कसा वाढला...

आमदार चव्हाण Prithviraj Chavan म्हणतात, बुलेट ट्रेनला Bullet train संसदेची मंजुरी नाही, त्याची निविदा नाही. मात्र, त्या प्रकल्पाचे भूमीपूजन होण्याआधीच त्याचा खर्च ६३ हजार कोटीवरून १.१० लाख कोटी रुपये झाला आहे.
बुलेट ट्रेनचा पांढर हत्ती; मंजुरीपूर्वीच खर्च 75 टक्क्यांनी कसा वाढला...
Prithviraj Chavansarkarnama

कऱ्हाड : बुलेट ट्रेनला मंजुरीपूर्वीच त्याचा खर्च 75 टक्क्यांनी वाढला आहे. बुलेट ट्रेनचा पांढरा हत्ती कोणासाठी आहे, याचा खुलासा केंद्राने करावा, असा सवाल करत काँग्रेस नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर टीका केली.

आमदार चव्हाण यांनी टिव्टरवरून टीकास्त्र टाकत केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. आमदार चव्हाण म्हणतात, बुलेट ट्रेनला संसदेची मंजुरी नाही, त्याची निविदा नाही. मात्र, त्या प्रकल्पाचे भूमीपूजन होण्याआधीच त्याचा खर्च ६३ हजार कोटीवरून १.१० लाख कोटी रुपये झाला आहे. म्हणजेच तो खर्च तब्बल ७५ टक्के नी वाढला आहे. हे सारे कोणासाठी सुरू आहे, याचा खुलासा होणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in