Congress : काँग्रेस अध्यक्षपदाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं....

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी कालच गुलाम नबी आझाद Gulab Nabi Azad यांची दिल्लीत Delhi भेट घेतली होती. मात्र, ही शिष्टाचाराची भेट होती, त्यात दुसरं काहीही नाही, असं त्यांनी सांगितले.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavansarkarnama

सातारा : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार आहे. त्यासाठी गांधी परिवारातलं कुणीही नको, अशी अनेकांची धारणा आहे. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नावं अध्यक्षपदाच्या रेसमध्ये आहेत. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे मी उमेदवार असणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसभेच्या सलग दोन निवडणूकांत झालेले पराभव, विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित निकाल, त्यानंतर विविध मार्गांनी काँग्रेसची सरकारं सत्तेतून जाणं, नेत्यांपाठीमागचा चौकशीचा ससेमिरा त्यात आता गुजरात, हिमाचल आणि हरियाणा राज्याच्या आणि २०२४ ची लोकसभेची तोंडावर येऊन ठेपलेली निवडणूक अशा सगळ्या परिस्थितीत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक (Congress President Election) होत आहे.

Prithviraj Chavan
Prafull Patel यांच्या मदतीला आले पृथ्वीराज चव्हाण... त्यांना बदनाम करू नका!

येत्या 17 ऑक्टोबरला अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय पक्षाच्या कार्यकारी समितीनं घेतला आहे. अध्यक्षपदासाठी गांधी परिवारातलं कुणीही नको, अशी अनेकांची धारणा आहे. राहुल गांधींनीही (Rahul Gandhi) त्यासंबंधीची तयारी दाखवलीय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

Prithviraj Chavan
राहूल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष होणार?: शरद यादव म्हणतात...

याच दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतंच काँग्रेसला रामराम ठोकलेल्या गुलाम नबी आझाद यांची भेट घेतल्यानं पृथ्वीराज बाबाही अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का? अशी चर्चा रंगलीय. मात्र, त्यांनी स्वतःच याबाबत खुलासा करत आपली भूमिका स्पष्ट केलीय. पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Prithviraj Chavan
काँग्रेसचे अखेर ठरले; अध्यक्ष पदाची निवडणूक होणार

आपण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही. मी उमेदवार असणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच जर फॉर्म भरला तर सर्वांना ते कळेलच ना असंही त्यांनी म्हंटलय. पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच गुलाम नबी आझाद यांची दिल्लीत भेट घेतली होती. मात्र, ही शिष्टाचाराची भेट होती, त्यात दुसरं काहीही नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, येत्या 22 सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना निघणार आहे. त्यानंतर 24 ते 30 सप्टेंबरदरम्यान अर्ज दाखल करता येणार आहे. 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in