Bharat Jodo Yatra : राहूल गांधींसोबत पृथ्वीराजबाबा चार किलोमीटर चालले....

जवळपास 2000 किलोमीटर अंतर चालत आलेले असून सुद्धा महाराष्ट्रात Maharashtra पोहचल्यानंतर राहुल गांधींचा Rahul Gandhi उत्साह यात्रेच्या पहिल्या दिवसासारखाच कायम होता.
Prithviraj Chavan] Rahul Gandhi, Sushilkumar Shinde
Prithviraj Chavan] Rahul Gandhi, Sushilkumar Shindesarkarnama

सातारा : राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात पोहोचली. या यात्रेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सहभाग नोंदवत राहूल गांधी यांच्यासोबत खतगाव फाटा पासून चार किलोमीटर पदयात्रा केली. राहूल गांधींचा उत्साह पहिल्या दिवसासारखाच होता. श्री. चव्हाण व माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांना त्यांच्या गतीने चालणे शक्य होत नसल्याने राहूल गांधींनी आपली चालण्याची गती कमी करत त्या दोघांसोबत चालत राहिले.

कन्याकुमारी येथून राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात पोहचली. या यात्रेचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. हि यात्रा जवळपास 2000 किलोमीटर अंतर चालत आलेली असून सुद्धा महाराष्ट्रात पोहचल्यानंतर राहुल गांधींचा उत्साह यात्रेच्या पहिल्या दिवसासारखाच कायम होता.

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सहभाग नोंदवित राहुल गांधींच्या सोबत खतगांव फाटा (ता. देगलूर जिल्हा नांदेड) येथून जवळपास चार किलोमीटर इतकी पदयात्रा केली. त्यांच्यासोबत माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे हेही चालत होते.

Prithviraj Chavan] Rahul Gandhi, Sushilkumar Shinde
Bharat Jodo Yatra News : राहुल गाधींच्या भारत जोडो यात्रेला तरुणांचा उदंड प्रतिसाद

या यात्रेतील अनुभव Twitter च्या माध्यमातून सांगताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, राहूल गांधी यांच्या गतीने आम्हाला चालणे शक्य होत नसल्याचे त्यांच्या लक्षात येताच राहुलजींनी आपल्या चालण्याची गती कमी करीत मला व सुशीलकुमार शिंदे साहेबांना सोबत घेऊन चालत राहिले.

Prithviraj Chavan] Rahul Gandhi, Sushilkumar Shinde
Bharat Jodo : द्वेशाला प्रेमाने उत्तर देण्यासाठी 'भारत जोडो' ,महाराष्ट्रात पदयात्रेचा पहिला दिवस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com