Abhijit Bichukale
Abhijit Bichukalesarkarnama

राष्ट्रपतीपदाचा उमेदवार विकतोय पुण्यात 'कंदी पेढे'

साताऱ्याच्या प्रसिद्ध कंदी पेढ्यांची चव आता पुणेकरांना बिचुकलेच्या दुकानात चाखायला मिळणार

सातारा : बिगबॉस फेम व कविमनाचा नेता अभिजित बिचुकलेंचे(Abhijeet Bichukale) कारनामे जगजाहीर आहेत. आत्तापर्यंत त्यांनी नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपदापर्यंतच्या निवडणूका लढल्या. साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनाही त्याने अनेकदा आव्हान दिले. अशा या अवलियाने आता व्यवसायात पदार्पण केलंय. त्याने पुण्यात कंदी पेढे विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

बिगबॉस फेम अभिजित बिचुकलेने आत्तापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या पण अद्यापपर्यंत त्याला एकदाही यश मिळालेले नाही. तरीही हार न मानता त्याने प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. 2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार', असे बेधडक वक्तव्यही त्याने केले होते. त्यानंतर त्याने पंढरपूरमधूनही नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. मात्र, इथंही त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अवघी 137 मतं त्याला मिळाली होती. परंतु, अभिजित बिचुकले हा आता वेगळ्याचं कारणानं चर्चेत आलाय.

Abhijit Bichukale
चंद्रकांत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं गोड स्वप्न

Big Boss च्या सिजन 2 च्या पर्वातही अभिजित बिचुकलेनं प्रेक्षकांचे मनोरंजन केलं होतं. आजवर केलेल्या आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे त्यानं अनेकांचं लक्ष्यही वेधून घेतलंय. अभिजित बिचुकले हे मूळचे सातारा जिल्ह्यातले आहेत. ''2019 चा मुख्यमंत्री मीच ठरणार'', ''सातारा माझी गादी मी छत्रपतींचा वैचारिक वारसदार'', 'एक दिवसासाठी मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा..' अशी अनेक वक्त्यव्य त्यानं केली. याच कारणामुळे त्याला बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणूनही प्रवेश मिळाला होता. त्यातही त्यानं चांगलीच वाहवा मिळवली होती.

बिग बॉसच्या घरात असताना त्यांना चेक बाऊन्सप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती, त्यावेळी बिचुकले प्रकरण खूप गाजलं होतं. त्याच्यावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली होती. बिग बॉसच्या घरात त्याची अभिनेत्री शिवानी सुर्वे सोबत चांगली मैत्री जुळली होती. बिचुकले आता आणखी एका कारणामुळं प्रसिद्धी मिळवताना दिसतोय. नुकताच त्याने पुण्यात स्वतःचा 'कंदी पेढे' (Kandi Pedha) विक्री व्यवसाय सुरू केलाय. बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा कंटेस्टंट पराग कान्हेरे याने नुकतीच ही बातमी

कळवलीय. त्यामुळे साताऱ्याच्या प्रसिद्ध कंदी पेढ्यांची चव आता पुणेकरांना बिचुकलेच्या दुकानात चाखायला मिळणार आहे. पुण्यातील शारदा गणपती मंदिराजवळ त्याने हे कंदी पेढ्यांचं दुकान थाटलंय. कान्हेरेनं बिचुकलेला त्यांच्या या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. निवडणुकीच्या रिंगणात चुकीचा निर्णय घेणारे अभिजित बिचुकले व्यवसायाबाबत निर्णय घेण्यास मात्र, चुकले नाहीत. त्यांच्या या व्यावसायाचे पुण्यात स्वागत झालंय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com