चक्क झेडपीच्या अध्यक्षांनीच मागितली टक्केवारी : कृषी सभापतींचा आरोप

झेडपीत टक्केवारीशिवाय काम मार्गी लागत नसल्याची आतापर्यंत कुजबुज होती.
चक्क झेडपीच्या अध्यक्षांनीच मागितली टक्केवारी : कृषी सभापतींचा आरोप
Aniruddha kamble-Anil MoteSarkarnama

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य उप केंद्राच्या कामांसाठी ६५ लाख रुपयांच्या फाईलवर कार्योत्तर मान्यता देण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे आणि त्यांचे स्वीय सहायक सूर्यकांत मोहिते यांनी एक टक्क्‍याची लाच मागितल्याचा आरोप कृषी पशुसंर्वधन सभापती अनिल मोटे यांनी केला आहे. झेडपीत टक्केवारीशिवाय काम मार्गी लागत नसल्याची आतापर्यंत कुजबुज होती. सभापतींनी थेट अध्यक्ष आणि त्यांच्या स्वीय सहायकावर आरोप केल्याने झेडपीतील राजकारण आणि प्रशासन ढवळून निघाले आहे. (president of Solapur ZP demand to agriculture chairpersons for a percentage)

कृषी सभापती मोटे यांनी आज (ता. ४ ऑक्टोबर) त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेत हा आरोप केला आहे. टक्केवारी मागत असल्याबाबतचा व्हिडीओच त्यांनी आज व्हायरल केला आहे. सभापती मोटे म्हणाले, तीन महिने कार्यात्तर मंजुरीची फाईल त्यांनी दडवून ठेवली होती. या कालावधीत सातत्याने टक्केवारीची मागणी होत होती. आरोग्य विभागाचा सात कोटी रुपयांचा निधी सरकारकडे परत गेला होता. मला साडेचार कोटी रुपये फेडायचे आहेत, असा उल्लखे या व्हिडीओमध्ये असल्याने ते साडेचार कोटी रुपये कोणाला द्यायचे आहेत. कोणासाठी झेडपीत टक्केवारीचे काम सुरु आहे, याची प्रचंड उत्सुकता जिल्ह्याच्या राजकारणात निर्माण झाली आहे.

Aniruddha kamble-Anil Mote
राष्ट्रवादीने खाते उघडले; पण भाजपने जाणकरांचा अंदाज चुकवत पॅनेल दिला!

लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार : अनिल मोटे

माझ्याकडे सातत्याने टक्केवारीची मागणी होत होती. मी कधी कोणाला टक्केवारी दिली नाही, त्यामुळे मी तुम्हाला टक्केवारी देऊ शकत नाही, असे मी त्यांना सांगितले. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज या विषयाला वाचा फोडली आहे. येत्या दोन दिवसांत टक्केवारी आणि लाचखोरीबद्दल रीतसर पोलिस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्यासह संबंधितांकडे तक्रार करणार आहे, असे कृषी समितीचे सभापती अनिल मोटे स्पष्ट केले.

Aniruddha kamble-Anil Mote
भगिरथ भालकेंनी स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून विठ्ठल कारखाना सुरू करावा

मोटे यांचा आरोप गांभीर्याने घेत नाही : झेडपी अध्यक्ष

सांगोला तालुक्यातील नराळे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वर्कऑर्डरला कार्योत्तर मंजुरीसाठी आपण एक टक्का म्हणजे 65 हजार रुपये मागितल्याचा आरोप सभापती अनिल मोटे यांनी नैराश्‍यातून केला आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. स्वतःच्या गावच्या विकासाला विरोध असणाऱ्या मोटे यांचा आरोप आपण फार गांभीर्याने घेत नाही. सांगोला तालुक्‍यातील अंतर्गत राजकारण यामध्ये आहे, असे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.