नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीचा वाजला बिगुल

महाराष्ट्र सरकारने ( Government of Maharashtra ) आता या संस्थांच्या निवडणुका ( Elections ) घेण्याचा अध्यादेश जारी केला आहे. त्यामध्ये आता नगर अर्बन बॅंकेची ( Nagar Urban Bank ) निवडणूक घेण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.
नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीचा वाजला बिगुल
Nagar urban bankSarkarnama

अहमदनगर : कोरोनाचा कहर कमी झालेला आहे. त्यामुळे राज्यभरातील सहकार विभागातील विविध संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होत आहे. मागील दीड वर्षापासून निवडणुकांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. त्यामुळे राज्यभरात सहकार विभागातील विविध संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. Preparations for Nagar Urban Bank elections begin

कोरोनाचा कहर वाढल्याने राज्य सरकारने सहकार खात्यातील विविध संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ दिली होती. कोरोनाचा कहर कमी होऊ लागला आहे. राज्य सरकारने आता या संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अध्यादेश जारी केला आहे. त्यामध्ये आता नगर अर्बन बॅंकेची निवडणूक घेण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसारच बॅंकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Nagar urban bank
नगर अर्बन बॅंक सोनेतारण गैरव्यवहार ! शेवगावच्या शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या

येथील बहुचर्चित नगर अर्बन बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता लवकरच सुरू होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसा आदेश सहकार खात्याने जारी केला आहे. बॅंकेने क्रेडिट सोसायटीला कर्ज देण्यास मनाई असतानाही कर्ज वाटप केले. तसेच बॅंकेचा एनपीए वाढल्याने बॅंकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यानंतर बॅंकेच्या काही शाखांमध्ये बनावट सोने ठेऊन त्यावर कर्ज घेतल्याचे उघड झाले होते. त्यावरून बॅंकेचे संचालक मंडळासह अधिकारी अडचणीत आले होते. या प्रकरणी काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. यामुळे तत्कालीन संचालक मंडळ चांगलेच अडचणीत आलेले आहे.

Nagar urban bank
"नगर अर्बन'च्या शाखाधिकाऱ्यांसह तिघांना अटक

आता बॅंकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्यामुळे विरोधकांनीही मोर्चेबांधणी करण्यास सुरवात झालेली आहे. माजी खासदार तथा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप गांधी यांचे निधन झाल्याने आता त्यांच्या गटाकडून बॅंकेसाठी कशी मोर्चेबांधणी केली जाते. तसेच गांधी अध्यक्ष असताना बॅंकेवर प्रशासक आल्याने गांधी गटाला विरोधक या निवडणुकीत कसे नामोहरण करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

इतिहासात पहिल्यांदाच प्रशासक

नगर अर्बन बॅंकेची स्थापना १९१०ला झाली. तेव्हापासून या बॅंकेचा कारभार सुरळीत सुरु होता. मात्र बॅंकेचा एनपीए वाढल्याने तसेच क्रेडिट सोसायटीला कर्ज देण्यास मनाई असतानाही ते दिले गेले. त्यामुळे बॅंकेवर आॅगस्ट २०१९मध्ये प्रशासकाची नियुक्ती झाली होेती. बॅंकेच्या इतिहासात प्रशासक नियुक्तीची ही पहिलीच वेळ. तेव्हापासून आतापर्यंत बॅंकेवर प्रशासक राज होते. ते आता संपूष्टात येणार आहे.

नगर अर्बन बॅंकेची निवडणूक घेण्यासाठी आपली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. बॅंकेला नियावलीनुसार मतदार यादी पाठविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.

- दिग्विजय आहेर, जिल्हा उपनिबंधक.

Related Stories

No stories found.