
Kolhapur News : राज्यात शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांचा जुनी पेंशन योजना लागू करावी, या मागणीसाठी संप सुरू आहे. संप आज गुरुवारी (१६ मार्च) तिसऱ्या दिवशी कायम असून, यावर तोडगा अजूनही तोडगा निघाला नाही. यामुळे सामान्यजनांचे फार हाल होत आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना, जुनी पेंशन आणि संपकऱ्याविरोधात सुशिक्षित बेरोजगारांचा (Unemployed March) मोर्चा निघणार असल्याचे पोस्टर व्हायरल होत आहे.
जुनी पेंशन थांबवा, देश वाचवा असा नारा सुशिक्षित बेरोजगारांनी दिला आहे. तसेच, संपकरी कर्मचाऱ्यांच्या जागेवर आम्ही अर्ध्या वेतनामध्ये आणि ते ही विनापेंशन काम करण्यास तयार आहोत, असे सांगण्यात आलेले आहे. जुनी पेंशन योजना थांबवून,राज्याला मोठ्या आर्थिक संकटातून वाचवण्याची हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांना जुनी पेंशन योजना बंद करण्यासंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे. हे निवेदन देण्यासाठी बेरोजगार युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. शुक्रवार दिनांक १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरूवात करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यावर जुन्या पेंशनच्या विरोधात निवेदन देण्यात येणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.