प्रभू रामाला साकडे घातले, धर्माचे राजकारण करणाऱ्यांना सद्बुद्धी मिळो...

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी सहकुटुंब नुकतीच तीन दिवसीय तीर्थयात्रा केली.
प्रभू रामाला साकडे घातले, धर्माचे राजकारण करणाऱ्यांना सद्बुद्धी मिळो...
Rohit PawarSarkarnama

पुणे - राज्यात सध्या भोंगे व हनुमान चालिसावरून राजकीय वातावरण तापले आहे. अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी अयोद्ध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. त्या आधीच कोणताही गाजा-वाजा न करता कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी सहकुटुंब नुकतीच तीन दिवसीय तीर्थयात्रा केली. यात त्यांनी पंढरपूर ते अयोद्ध्या असा प्रवास केला. ( Pray to Lord Rama that people who do politics of Dharma get wisdom ... )

या यात्रेत त्यांनी पंढरपूर, पुष्कर, अजमेर, मथुरा, वाराणसी, गया, अयोद्धया येथील विविध धार्मिक स्थळांना भेटी देत सर्वधर्म समभाव जोपासला. ही यात्रा अटोपून आमदार रोहित पवार आज पुण्यात आले. यावेळी त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या प्रवासासह राजकारणावर मत व्यक्त केले.

Rohit Pawar
राजेश टोपे म्हणाले, रोहित पवार राष्ट्रवादीचे स्टाईल आयकॉन

आमदार रोहित पवार म्हणाले, अध्यात्म आणि धर्मामध्ये स्पर्धा कोणाचीही नसते. तुम्ही कधीही मंदिरात किंवा एखाद्या संतपीठला जाऊ शकता. यात जर स्पर्धा होत असेल तर ती योग्य नाही. धार्मिक स्थळांच्या पर्यटनात राजकीय बाजार मांडणे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, अयोद्ध्येचा दौरा हा कुठल्याही राजकीय फायद्यासाठी नसून कौटुंबिक होता. माझ्या आईचे वडील काही दिवसांपूर्वी वारले आणि आईला वाटत होते की तीर्थक्षेत्राला जाऊन यावे. यासाठी सर्व कुटुंब बरोबर अयोध्येत गेलो. कुठल्या मंदिरांत गेलो की चर्चा होत नाही मात्र राम मंदिरात गेलो की चर्चा होते याच आश्चर्य वाटते.

Rohit Pawar
रोहित पवार म्हणाले, भाजपने महाराष्ट्राच्या संस्कृतीला लक्ष्य केलय...

धर्माचे राजकारण कोणी करू नये हा आपला व्यक्तिगत विषय तो व्यक्तिगतच राहिला हवा. 4 तारखेचा अल्टिमेटम दिला होता मात्र भोंगा काढायचा निर्णय तो मंदिर आणि मशीद यांचा वैयक्तिक होता. काही राजकीय व्यक्तींना दंगल व्हावी, असे वाटत असावे आणि यातून राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे वाटते असावे. मात्र लोकांना शांतता हवी आहे. जातीयवादाचा मुद्दा राज ठाकरेंनीच त्यांच्या सभेत उपस्थितीत केला, असे त्यांनी सांगितले.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत ते म्हणाले, केंद्राने आपल्याला इम्पिरिकल डाटाची माहिती दिली नाही. भाजपने सांगितले होते की ही माहिती बरोबर आहे. मग महाराष्ट्राचा विषय आला तेव्हा ती माहिती का देत नाहीत. भाजपला यात सुद्धा राजकारण करायचं असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अयोद्धेतील रामाच्या दर्शना बाबत त्यांनी सांगितले की, प्रभू श्री रामांना एवढेच साकडे घातले की धर्माचे राजकारण करणाऱ्या लोकांना सद्बुद्धी मिळो. राजकारण करायचे असेल तर विकासाचे करा धर्माचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Rohit Pawar
... तर कर्जत व जामखेडमध्ये लोकशाही राहणार नाही

आ.ह. साळुंखे यांचे पुस्तक वाचा

शिवाजी महाराज यांच्या समाधीचा विषय काढून वेगळी दिशा द्यायचा प्रयत्न कशाला. आ.ह. साळुंखे यांनी जे पुस्तकं लिहलेले आहे ते राज ठाकरे आणि भाजपने वाचावे आणि त्यानंतर चर्चा करू. जुने विषय काढणार असाल तर मग लोकांच्या प्रश्नावर कोण बोलणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.