जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदीची मागणी राज ठाकरेंनी कधी केली का? गायकवाडांचा रोखठोक सवाल

जेम्स लेनच्या पुस्तकावरुन सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदीची मागणी राज ठाकरेंनी कधी केली का? गायकवाडांचा रोखठोक सवाल
Raj Thackeray, Praveen Gaikwadsarkarnama

सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जेम्स लेन प्रकरणात कधी निषेध नोंदवला नाही, की पुस्तकावर बंदीची मागणी केली नाही. सध्या मनसे पुन्हा उभी राहणे कठीण आहे. अशावेळी भाजपला (BJP) फायदा होण्यासाठी राज ठाकरे बेरजेचे राजकारण करत आहेत. त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केली, असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Praveen Gaikwad) यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

गायकवाड म्हणाले, ''जेम्स लेनच्या वादग्रस्त लिखाणाबद्दल शिवसेनेने भांडारकर प्राच्यविद्याचे श्रीकांत बहुलकर यांना काळे फासले होते. तेव्हा राज ठाकरे यांनी बहुलकर यांची माफी मागितली होती. त्यानंतर ठाकरे यांनी कधीही याबद्दल निषेध नोंदवला नाही. नुकतेच त्यांनी जातीयवादी चर्चा घडवून आणली. वास्तविक जेम्स लेनने भांडारकर प्राच्यविद्या केंद्र हे माझे घर असल्याचे म्हटले होते. लेनच्या पुस्तकातील पान नं. ९३ व बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकातील पान नं. १२६ वरील मजकुरात साम्य असल्याचे दिसून येते, असेही गायकवाड यांनी सांगितले. जेम्स लेन दोषी तर आहेच. मात्र, त्याला माहिती कोण दिली त्याचा शोध घेणे गरजेचे आहे.

Raj Thackeray, Praveen Gaikwad
राज ठाकरेंचे थेट लक्ष्य शिवसेनाच! डॅमेज कंट्रोलचे उद्धव ठाकरेंपुढे आव्हान

गायकवाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहेत. त्यांच्याशी संबंधित हा वादग्रस्त विषय थांबला पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घातल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवली. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ते पुस्तक मिळते. त्यावर बंदी आली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ऑक्सफर्ड प्रकाशनकडे ते अधिकार आहेत. भांडारकर केंद्रावर ब्रिगेडने कारवाई केल्यानंतर ते पुन्हा उभे करण्यासाठी कोट्यवधी रूपयाचा निधी संकलित झाला.

Raj Thackeray, Praveen Gaikwad
शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या कटात राज ठाकरेंचा सहभाग : शिवचरित्र अभ्यासकाचा आरोप

मात्र, शिवाजी महाराजांची बदनामी काही भरून निघाली नाही. ''राज ठाकरे यांनी आजपर्यंत प्रत्येकवेळी त्यांची भूमिका बदलली आहे. त्यांच्या पक्षाच्या झेंड्याचाही रंग बदलला आहे. स्वत: जातीयवादी वक्तव्य करुन शरद पवारांना जातीयवादी म्हणणे म्हणजे विरोधाभास आहे.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.