प्रवीण दरेकरांचे राज्यपालांना पत्र : राज्य सरकारचे दोन दिवसांतील निर्णय रद्द करण्याची मागणी

भाजप नेते प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी राज्य भवनाला पत्र लिहून मागील दोन दिवसांतील निर्णय रद्द करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे.
प्रवीण दरेकरांचे राज्यपालांना पत्र : राज्य सरकारचे दोन दिवसांतील निर्णय रद्द करण्याची मागणी
Pravin Darekar Sarkarnama

मुंबई - राज्यातील शिवसेनेला खिंडार पडल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी राज्य भवनाला पत्र लिहून राज्य सरकारने मागील दोन दिवसांत घेतलेले निर्णय रद्द करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. मागील 48 तासांत राज्य सरकारने 160 च्यावर आदेश काढल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. ( Praveen Darekar's letter to the Governor: Demand to cancel the decision of the state government within two days )

या पत्रात प्रवीण दरेकर यांनी म्हंटले आहे की, कोरोनाच्या संसर्गातून आता आपली प्रकृती सुधारत असेलच. आपल्याला उत्तम आरोग्य लाभो, अशी मी प्रार्थना करतो. एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. राज्यातील राजकीय स्थिती ही मागील तीन दिवसांत अत्यंत अस्थिरतेची बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनीषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळले आहे.

Pravin Darekar
हिंदुत्वाची चळवळ सरकार दडपतयं; राज यांना पाठिंब्यासाठी प्रवीण दरेकर धावले

राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णय सपाटा राबविला जात आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे. आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त सुद्धा प्रकाशित झाले आहे. 160 च्या वर शासन आदेश 48 तासांत जारी करण्यात आले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Pravin Darekar
प्रवीण दरेकर हाजीर हो..! आठवडाभरात दुसऱ्यांदा पोलीस ठाण्यात हजेरी

विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे. अडीच वर्षे निर्णयशून्य असलेले महाविकास सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे, अशी स्थिती आहे. पोलीस दल व अन्य महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचा सुद्धा घाट घातला जात आहे. यापूर्वी पोलीस दलांत झालेल्या महाभ्रष्टाचारात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनाच तुरूंगामध्ये जावे लागले आहे.

महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आणि जनतेच्या हक्काच्या असलेल्या या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in