Pratik Patil : जयंत पाटलांच्या मुलाचं राजकीय लाँचिग : वडिलांसारखीच लढवणार पहिली निवडणूक!

Jayant Patil : वडिलांची जी पहिली निवडणूक, तीच निवडणूक मुलाची!
Pratik Patil : Jayant Patil
Pratik Patil : Jayant Patil Sarkarnama

Pratik Patil : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांचा अलीकडेच शाही विवाह पार पडले. या शाही विवाहाची राज्यभर एकच चर्चा होती. या विवाहास राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत सर्वपक्षीय़ नेते उपस्थित राहिले होते. सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करून आपल्या मुलाच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने हे एक प्रकारचे शक्तिप्रदर्शनच असल्याचे बोलेले जात होते.

आता मात्र जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांचा राजकारणात अधिकृतपणे प्रवेश होणार आहे. प्रतीक पाटील हे राजकारणाच्या मैदानात उतारणार आहेत. यामुळे आता प्रतीक पाटलांचा राजकारणात लाँचिग झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Pratik Patil : Jayant Patil
Rahul Narvekar News : राहुल नार्वेकर, लोढांवर अटकेची टांगती तलवार? अजामीनपात्र वॉरंट जारी!

प्रतीक पाटलांनी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. साखर कारखान्याच्या महत्त्वपूर्ण निवडणुकींच्या माध्यमातून प्रतीक पाटील पहिल्या-वहिल्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. स्वत: जयंत पाटील यांनीही आपलं राजकीय पदार्पण साखर कारखान्याच्या निवडणुकीतून केले होते. आता आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रतीक पाटील राजकारणात येत आहेत.

राजाराम बापू साखर कारखान्याच्या या निवडणुकीत संचालक पदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी असणार आहे. अशा वेळी संचालकपदाची आस लावून बसलेल्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्या मुलाला संधी देताना जयंत पाटलांची अडचण होणार, असेही बोलले जात आहे. संचालक मंडळात कुणाकुणाची वर्णी लावायची याचा निर्णय जयंत पाटील यांच्याकडे असला तरी, निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेणं त्यांना परवडणारे नाही. अशा परिस्थितीत मुलाला संधी देताना, कार्यकर्त्यांची मनधरणी त्यांना करावी लागू शकते.

Pratik Patil : Jayant Patil
Satara : ठाकरे सेना तुम्हीच राष्ट्रवादीच्या मांडीवर नेऊन बसवली... शंभूराज देसाई

मागील काही काळापासून प्रतीक पाटलांच्या राजकीय लाँचिगसाठी जयंत पाटील तयारी करत असताना दिसून येत होते. यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाकडून काढण्यात आलेल्या संवाद यात्रेत प्रतीक पाटील यांचे डिजिटल पोस्टर असो किंवा पक्षाच्या विविध मोर्चात त्यांचा सहभाग, त्यांच्या शाही विवाहात सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती ही त्यांच्या राजकीय प्रवेशाची चुणूकच असल्याचे दिसून आले होते.

प्रतीक पाटील यांनी सांगलीतील वाळवा इस्लामपूर मतदारसंघात कामं करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी राजकारणात प्रवेशाच्या दृष्टीने लक्ष दिले होते. आज त्यांचा खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in