Wai : प्रतापगड उत्सव समितीच्या २५ वर्षांच्या लढ्याला यश; पेढे वाटून आनंदोत्सव...

प्रतापगड उत्सव समितीने Pratapgad Utsav Samiti केलेली आंदोलने व न्यायालयीन प्रक्रिया लढली त्याची दखल घेऊन प्रशासनाला आज त्या ठिकाणी असलेले अनधिकृत बांधकाम Unauthorized construction तोडावे लागले आहे.
Pratapgad Utsav Samiti
Pratapgad Utsav Samiti sarkarnama

वाई : प्रतापगडावरील अफजलखान थडग्याच्या परिसरतील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन आहे. गडावरील अफजलखान थडग्याचे चाललेले उदात्तीकरण रोखण्यासाठी प्रतापगड उत्सव समितीच्या माध्यमातून गेली २५ वर्षे शिवभक्त व हिंदुत्ववादी संघटनांनी निवेदने, आंदोलन व न्यायालयीन मार्गाने दिलेल्या लढ्याचे हे यश असल्याची प्रतिक्रिया उत्सव समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले यांनी दिली.

वास्तविक या थडग्याच्या परिरसरतील अतिक्रमनाबाबत यापूर्वीच उच्च न्यायायलात निकाल लागला आहे. त्याचवेळी ही कार्यवाही होणे अपेक्षित होते,असेही त्या म्हणाल्या.दरम्यान आज अतिक्रमण हटविण्यात आल्याने उत्सव समिती व तालुक्यातील शिवभक्त तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

श्रीमती भोसले म्हणाल्या, १९९६ पासून गेली २५ वर्षे प्रतापगड उत्सव समितीच्या माध्यमातून मिलिंद एकबोटे, विनायक सणस, पंडितराव मोडक, राजीव मोहिते, पोपट बर्गे, सुनील घाडगे, बाबा चव्हाण आणि तालुक्यातील, शहरातील तसेच महाराष्ट्रातील असंख्य शिवभक्त यांना एकत्र घेऊन गडावरील अफजल खान थडग्याच्या परिसरांत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला.

Pratapgad Utsav Samiti
शिवरायांच्या भूमीतून औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मनसेची मागणी

त्यासाठी सातारा, पुणे, मुंबई, कोल्हापूर व महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये स्थानिक कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन उत्सव समितीने वेळोवेळी आंदोलने केली. शहरातील शिवभक्त यांना एकत्र घेऊन अफजल खान थडग्या जवळील अनधिकृत बांधकाम हटवण्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला. समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये ॲड. नितीन प्रधान व ॲड. सौ. जयश्री खोत व त्यांच्या सहका-यांच्या माध्यमातून लढा देऊन मुंबईस्थित अफझलखान मेमोरियल ट्रस्टची मान्यता अवैध असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आणि हा ट्रस्ट रद्द करून घेतला.

Pratapgad Utsav Samiti
अफझल खान कबर परिसर पर्यटकांसाठी खुला करा : माजी आमदार नितीन शिंदे

त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयात अफजलखान थडग्याशेजारी अनधिकृत बांधकाम आहे,हे वेळोवेळी पुरव्यासह कोर्टाच्या निदर्शना आणून दिले. त्यामुळे उत्सव समितीने केलेली आंदोलने व न्यायालयीन प्रक्रिया लढली त्याची दखल घेऊन प्रशासनाला आज त्या ठिकाणी असलेले अनधिकृत बांधकाम तोडावे लागले आहे. त्याबद्दल सर्व शिवभक्त व प्रशासनातील महाबळेश्वर, वाई, सातारा, पुणे, कोल्हापूर, मुंबई व दिल्ली येथे असणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकारी व मंत्री यांचे उत्सव समितीच्या वतीने अभिनंदन करते.

Pratapgad Utsav Samiti
Satara : शिवाजी महाराजांचे स्मारक सातारा पालिकेकडे हस्तांतरीत करा... शिवेंद्रसिंहराजे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com