ढाकणेंचे राजळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप : तनपुरेंनी दिले चौकशीचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे ( Pratap Dhakne ) यांनी पाथर्डी नगरपालिकेतील विकासकामासाठी आमदार मोनिका राजळे ( Monica Rajale ) यांनी टक्केवारी घेतल्याचा आरोप केला आहे.
ढाकणेंचे राजळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप : तनपुरेंनी दिले चौकशीचे आदेश
Monica Rajale Vs. Pratap DhakneSarkarnama

उमेश मोरगावकर

पाथर्डी ( जि. अहमदनगर ) : पाथर्डी नगरपालिका, अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जवळ आल्याने पाथर्डी तालुक्यात राजकीय आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे ( Pratap Dhakne ) यांनी पाथर्डी नगरपालिकेतील विकासकामासाठी आमदार मोनिका राजळे ( Monica Rajale ) व पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतल्याचा आरोप केला आहे. Pratap Dhakne accuses Rajale of corruption: Minister Tanpur orders inquiry

पाच वर्षात पालिकेला 120 कोटींचा निधी मिळाला. मात्र, या निधीत आमदार मोनिका राजळे व पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी टक्केवारी घेत घोटाळे केले. या घोटाळ्यांची चौकशी करावी, अशा सूचना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती प्रताप ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Monica Rajale Vs. Pratap Dhakne
मोनिका राजळे म्हणाल्या, सध्या काहींना निवडणुका जवळ आल्याने डोहाळे लागलेत...

या वेळी शिवशंकर राजळे, भगवान दराडे, सीताराम बोरुडे, भाऊसाहेब धस, चंद्रकांत भापकर, नासिर शेख, योगेश रासने, देवा पवार, बबलू शिरसाठ उपस्थित होते.

ढाकणे म्हणाले की, मागील पाच वर्षांतील 15 कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी तनपुरे यांच्याकडे केल्या नंतर हे आदेश दिले आहेत. शिकलेला उमेदवार दिला म्हणून लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला. मात्र, तुम्ही सर्वांनी घोटाळे केल्याने जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. तुम्हाला उघडे पाडल्या शिवाय आता स्वस्थ बसणार नाही. या सर्व घोटाळ्याची जबाबदारी राजळे यांनी स्वीकारावी अन्यथा समोरासमोर चर्चा करायची माझी तयारी आहे.

Monica Rajale Vs. Pratap Dhakne
राजेंद्र फाळके म्हणाले, प्रताप ढाकणे षटकार मारणार...

कल्पकता व इच्छाशक्तीचा अभाव असल्याने शहर विकासकामांच्या बाबतीत मागे गेले. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत सत्य बाहेर येईल. नागरिक सध्या तोंड दाबून बुक्याचा मार खात आहेत. नागरिक करांच्या माध्यमातून तुम्हाला पैसे देतात. मात्र, त्या बदल्यात तुम्ही लोकांना काय दिले आहे. पालिका स्थापने पासून एव्हडा गलथान कारभार कधीही झाला नाही. पाण्याच्या टाकीचे काम दर्जाहीन चालू असल्याचे तुमचेच नगरसेवक सांगतात. जेसीबी, निऱ्हाळी नाट्यगृह, मुंडे जॉगिंग पार्क या सर्व कामात मोठा घोटाळा झाल्याचेही ढाकणे म्हणाले.

Monica Rajale Vs. Pratap Dhakne
अॅड. प्रताप ढाकणे यांच्या पुनर्वसनासाठी आमदार रोहित पवार प्रयत्न करणार

चौकशीत सत्य बाहेर येईल

जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत सत्य बाहेर येईल. नागरिक तोंड दाबून बुक्याचा मार खात आहेत. नागरिक कराच्या माध्यमातून पैसे देतात. मात्र, त्या बदल्यात लोकप्रतिनिधींनी लोकांना काय दिले. पालिका स्थापने पासून असा मोठा गलथान कारभार कधीही झाला नसल्याचे ढाकणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.