‘भीमा’च्या निवडणुकीबाबत परिचारकांनी फडणवीसांना ‘हा’ शब्द दिला होता : महाडिकांनी सांगितली इनसाईड स्टोरी

त्यांचा या कारखान्याशी काय संबंध नाही. कारण परिचारकांचे दोन, तर पाटील यांचा एक कारखाना आहे. मग आमच्या कारखान्यावर त्यांची नजर का?
Dhananjay Mahadik-Prashant Prachikar-Devendra Fadnavis
Dhananjay Mahadik-Prashant Prachikar-Devendra FadnavisSarkarnama

मोहोळ : भीमा कारखान्याची (Bhima Sugar Factory) निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याची विनंती मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केली होती. माझ्या विनंतीवरून फडणवीसांनी माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Prachikar) आणि राजन पाटील (Rajan Patil) यांना फोन केला. मात्र, परिचारकांनी दोन जागा दिल्यास निवडणूक बिनविरोध करण्याचा शब्द फडणवीसांना दिला. मी त्यालाही तयार नव्हतो; पण फडणवीसांचा आदेश मानून तयार झालो. पण, माघारीच्या दिवशी परिचारकांनी सांगितले की पाटील दहा जागा मागत आहेत, त्यानंतर मात्र मी भीमा कारखान्याची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केला. (Prashant Prachikar had promised Fadnavis not to contest Bhima factory : Dhananjay Mahadik)

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार्य केलेल्या पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा या तालुक्यातील नेते मंडळींचा सन्मान व नूतन संचालकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात महाडिक बोलत होते.

ते म्हणाले की, निवडणूक प्रचाराच्या काळात मी उल्लेख केला नव्हता. पण आता निवडणूक झाली आहे, त्यामुळे ती गोष्ट बोलायला आता हरकत नाही. भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मी खूप प्रयत्नशील होतो. त्यासाठी मी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे विनंती केली हेाती. भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी. कारण, आमच्यासमोर आज जे विरोधक आहेत, त्यांचा भीमा कारखान्याशी कसलाही संबंध नाही. माजी आमदार राजन पाटील तर कारखान्याचे सभासदसुद्धा नाहीत. ही निवडणूक लादण्याचा त्यांचा प्रयत्न आणि अपप्रचार सुरू आहे. आपण हस्तक्षेप केला तर पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे आपला शब्द टाळणार नाहीत. निवडणूक छोटी आहे; पण आपण माझ्यासाठी प्रयत्न करावा, अशी विनंती केली होती.

Dhananjay Mahadik-Prashant Prachikar-Devendra Fadnavis
गुवाहाटीत झालेल्या राजकीय स्फोटाची बत्ती आमदार राऊतांनी बार्शीतून पेटवली : कल्याणशेट्टींचा सत्तापालटाबाबत गौप्यस्फोट

फडणवीसांनी दोघांनाही फोन केला आणि बोलावून घेतले. राष्ट्रवादीचा मेळावा असल्यामुळे राजन पाटील काही फडणवीसांना भेटायला गेले नव्हते. पण, प्रशांत परिचारक हे फडणवीसांना भेटायला गेले. चर्चेनंतर त्यांनी सांगितले की, राजन पाटील काही तयार नाहीत. माझी काही अडचण नाही. दोन जागा आम्हाला दिल्या तर आम्ही भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोध करू, असा शब्द प्रशांत परिचारकांनी फडणवीसांना दिला होता, असेही महाडिक यांनी सांगितले.

Dhananjay Mahadik-Prashant Prachikar-Devendra Fadnavis
राष्ट्रवादीला मोठा धक्का : वरिष्ठ आमदाराने तडकाफडकी पक्ष सोडला

ते म्हणाले की, फडणवीस यांनी मला बोलावून सांगितले की, ते दोन जागा मागत आहेत. मी त्यांना म्हटलं की, मी जागा काही देणार नाही. कारण, त्यांचा या कारखान्याशी काय संबंध नाही. कारण परिचारकांचे दोन, तर पाटील यांचा एक कारखाना आहे. मग आमच्या कारखान्यावर त्यांची नजर का. आमचं राजकारण अडचणीत येईल, असे ते म्हणत आहेत. दोन संचालक नसल्याने त्यांचं राजकारण कसं अडचणीत येईल, असे मी फडणवीस यांना म्हटलं. त्यानंतरही मी त्यांना आणखी प्रयत्न करण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी प्रयत्न केले. मात्र, ते दोन जागावर ठाम राहिले. फडणवीस मला त्याबाबत काही बोलले नाहीत.

Dhananjay Mahadik-Prashant Prachikar-Devendra Fadnavis
Bhima Sugar : धनंजय महाडिक गटाचा मोठा विजय; ६५०० च्या फरकाने सर्व जागांवर मारली बाजी

मी दोन तारखेला सोलापुरात आलो. कारण तीन तारखेला माघार होती. त्या दिवशी मला फडणवीस यांचा फोन आला, त्यांनी सांगितले की, माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे, तुम्हीही बोलून घ्या. दोन जागा द्यायला काही हरकत नाही. शेवटी बहुमत तुमचंच राहील, त्यामुळे तुम्ही दोन जागा द्याव्यात, अशी सूचना त्यांनी मला केली. फडणवीस यांचा शब्द कसा मोडायचा; म्हणून मी या दोघांशी मी बोललो. मी त्यांना सांगितलं की निवडणुकीचा मोठा खर्च आहे, संस्था आणखी अडचणीत जाईल. तो टाळण्यासाठी मी दोन जागा द्यायला तयार आहे. मी सहकाऱ्यांशी बोलून त्यांना दोन जागा देण्याचा शब्द दिला. बरं झाला, आता मार्ग निघेल. मी तुम्हाला रात्री फोन करतो, असे प्रशांत परिचारक यांनी सांगितले. मात्र, रात्री त्यांचा काही फोन आला नाही, असे महाडिकांनी स्पष्ट केले.

Dhananjay Mahadik-Prashant Prachikar-Devendra Fadnavis
Bhima Sugar : मोहोळची लिट्‌मस टेस्ट ‘डिस्टिंक्शन’मध्ये जिंकली; आता भीमा पॅटर्न कायम राहणार : उमेश पाटलांची प्रतिक्रिया

महाडिक म्हणाले की, दुसऱ्या दिवशी सकाळी दहा साडेदहा वाजता परिचारक यांचा फोन आला. ते म्हणाले की, माझी काय अडचण नाही. पण राजन पाटील दहा जागा मागत आहेत. पंधरामधील १० जागा त्यांना पाहिजेत. म्हणजे पाच जागा राजन पाटील यांना, पाच जागा परिचारकांना आणि पाच जागा महाडिकांना. हा फॉर्म्युला होऊ शकतो का हो. फडणवीस यामध्ये असल्यामुळे त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटलं; म्हणून मी प्रचारात याचा उल्लेख केला नाही. फडणवीस यांचा शब्द असल्यामुळे परिचारक यात भाग घेणार नाहीत, असे वाटलं होतं. पण, तेही प्रचारात सहभागी झाले आणि टाकळी चौकात काहीतर वाईटवंगाळ बोलले आणि गेले. त्यांचा काहीही संबंध नसताना त्यांनी भीमा कारखान्याची निवडणूक लावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com