‘दामाजी’च्या निवडणुकीपासून दुरावलेले परिचारक-आवताडे समर्थक आले एकाच व्यासपीठावर!

हा एकोपा असाच टिकणार की पुन्हा दोन्ही गटाची तोंडे वेगवेगळ्या दिशेला होणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Mangalveda BJP Meeting
Mangalveda BJP MeetingSarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा (Mangalveda) तालुक्यातील दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून भाजप (BJP) आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) आणि माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांच्या समर्थकांमध्ये अंतर वाढत चालेले होते. मात्र, पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांनी सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने बोलावलेल्या बैठकील हे दोन गट मागचं सर्व विरून एकाच व्यासपीठावर आले होते. आगामी निवडणुका गटाऐवजी पक्षाच्या चिन्हावर लढविण्याची तंबीही कल्याणशेट्टी यांनी दिली. मात्र, हा एकोपा असाच टिकणार की पुन्हा दोन्ही गटाची तोंडे वेगवेगळ्या दिशेला होणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Prashant Paricharak-Samadhan Avtade supporters came on the same platform)

पंढरपूर पोटनिवडणूकीत प्रशांत परिचारक यांनी एक पाऊल मागे घेतल्याने आमदार समाधान आवताडे यांना पक्षाने संधी दिली. दोघांच्या एकोप्याने पोटनिवडणुकीत पंढरपुरात कमळ फुलविले. मात्र, त्यानंतर झालेल्या दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे आणि परिचारक समर्थकांमध्ये जागा वाटपावरून बिनसले. दोन्ही समर्थक निवडणुकीत एकमेकांना भिडले. भाजपच्या पाच पदाधिकाऱ्यांनी आमदार समाधान आवताडे गटाला आव्हान देत भालके समर्थकांच्या मदतीने दामाजी कारखान्यावरील सत्ता हस्तगत केली. त्यामुळे तालुक्यात परिचारक गट मजबूत होऊ लागल्याने त्यांच्या समर्थकांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. ही गटबाजी पक्षासाठी भविष्यात धोकादायक ठरू शकते, याची पक्षपातळीवरून घेण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.

Mangalveda BJP Meeting
आता सरकारही गेलं आणि मामाही गेले : हर्षवर्धन पाटलांचा दत्तात्रेय भरणेंना टोमणा

पावसाळी अधिवेशनात आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थित केलेल्या पाणीप्रश्‍नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी सांनी दिलेल्या आश्‍वानानंतर मंगळवेढ्यात आवताडे समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. त्या कार्यक्रमापासून परिचारक समर्थक दूर राहिले होते. मात्र, पंढरपूर व मंगळवेढा येथील औद्योगिक वसाहतीबाबत मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आमदार आवताडे यांच्यासोबत परिचारक यांचे विरोधक मनसेचे दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीवरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

Mangalveda BJP Meeting
हायकोर्टाचा फडणवीसांना धक्का; कल्याणशेट्टींच्या प्रस्तावावरील शिफारस केली अमान्य!

नव्या सोबतीमुळे आमदार आवताडे यांचा राजकीय ट्रॅक भविष्यात बदलण्याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच आज मंगळवेढयातील शिशुविहार येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार समाधान आवताडे यांनी सेवा पंधरवड्यात केंद्र व राज्य सरकारच्या योजना वंचित घटकापर्यत पोचवण्याचे काम करावे. पंतप्रधानांची व उपमुख्यमंत्र्याची संकल्पना, विचार तळागाळापर्यंत पोहोचवला हवी. पद मिळाले तर काम करेन, ही भूमिका सोडली पाहिजे.

Mangalveda BJP Meeting
Solapur Congress : सोलापुरातून शिंदे, म्हेत्रे, मोहिते पाटलांसह १९ जण करणार काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठी मतदान

आगामी निवडणूका पक्षाच्या चिन्हावर लढण्याचे संकेत देताना आमदार समाधान आवताडे इथे आहेत, तर प्रशांत परिचारक यांच्याशीही त्याबाबत बोलणार असल्याचे कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले. या वेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, शशिकांत चव्हाण औदुंबर वाडदेकर, विवेक खिलारे, तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल, शहराध्यक्ष गोपाळ भगरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com