परिचारक गटाचा स्वबळाचा नारा दबावतंत्राचा भाग की स्वतंत्र लढण्याची तयारी?

आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमने-सामने येण्याची चिन्हे दिसत आहे.
Prashat Paricharak-Samadhan Autade
Prashat Paricharak-Samadhan Autadesarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एकमेकांच्या हातात हात घालून महाविकास आघाडीला धक्का देणारे आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) आणि माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमने-सामने येण्याची चिन्हे दिसत आहे. पोटनिवडणुकीत आवताडे यांना विजयापर्यंत नेणाऱ्या परिचारक गटाने दामाजी साखर कारखाना निवडणुकीसाठी स्वबळाचा दिलेला इशारा प्रत्यक्षात येणार की दबावतंत्राचा भाग आहे, याची चर्चा मंगळवेढा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली. (Prashant Paricharak Group Will fight on its own in Damaji Sugar Factory elections?)

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत सलग दोन पराभवानंतर विजय मिळवायचाच, या इराद्याने आवताडे रिंगणात उतरले होते. भाजपच्या वरिष्ठ पातळीवर राजकीय मोट बांधत प्रशांत परिचारक यांना दोन पावले मागे घ्यायला लावत आवताडे यांनी आमदारकीची माळ अखेर गळ्यात पाडून घेतलीच.

Prashat Paricharak-Samadhan Autade
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी मोदींना साकडे; कंचन गिरींनी लिहिले पत्र!

समाधान आवताडे यांच्या विजयामुळे राज्यात तयार झालेली महाविकासआघाडी ही जनतेच्या विरोधात असल्याचे दाखवून देण्यात भाजप यशस्वी ठरला. मात्र एक वर्षानंतर त्यांच्याच नेतृत्वाखाली असलेल्या दामाजी कारखान्यावरील एक हाती वर्चस्वाला शह देण्यासाठी तालुक्यातील अनेक मातब्बर एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत पोटनिवडणुकीत आमदार आवताडे यांच्या विजयात मोलाची कामगिरी केलेल्या परिचारक गटाने नुकतीच मंगळवेढ्यात दामाजी कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. त्या बैठकीत परिचारक गटाने स्वबळावर लढण्याचा इशारा दिला. मात्र, निर्णय प्रशांत परिचारकांवर सोपवला आहे, त्यामुळे परिचारक यांची भूमिका यामध्ये महत्त्वाची असली तरी कार्यकर्त्यांची बाजू घेऊन निर्णय घेणार की वेगळा निर्णय लादणार, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Prashat Paricharak-Samadhan Autade
आमचे पाणी पळवाल; तर सोलापुरात पाय ठेवू देणार नाही : देशमुखांचा भरणेंना इशारा

मागील निवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांच्या बरोबर असलेले अॅड नंदकुमार पवार, आवताडे यांचे चुलते बबनराव आवताडे व अन्य काही नेत्यांनी आता आमदारांच्या विरोधात मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या शाहू परिवारानेही अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केली नाही, त्यामुळे कारखान्यावर सत्तास्थापनेसाठी आवताडे यांना परिचारकांबरोबर शाहू परिवार देखील महत्त्वाचा ठरणार आहे. आवताडेंपासून फारकत घेतलेल्यांची जागा भरून काढण्यासाठी परिचारक गट आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी किती जागा पदरात पाडून घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Prashat Paricharak-Samadhan Autade
राष्ट्रवादीचा बार फुसका; संग्राम थोपटेंसह १० जणांची ‘राजगड’वर बिनविरोध निवड!

प्रशांत परिचारक समर्थक काशिनाथ पाटील यांनी पोटनिवडणुकीसारखं एकसंध लढला तर विजयाची शक्यता आहे. स्वतंत्र लढल्यास तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो, हे गणित मांडले आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असलेले विविध मतप्रवाह, भविष्यात मंगळवेढा तालुक्यात परिचारक गटबांधणीचे गणित कसे जुळवतात, यावरच परिचारक गटाचे भवितव्य अवलंबून आहे. तालुक्यात सध्या अस्तित्वात असलेल्या गटाचे अस्तित्व न वाढण्यास स्वतः प्रशांत परिचारक जबाबदार आहेत. त्यांनी आपला गट प्रभावी करण्याच्या दृष्टीने 2014 नंतर कार्यकर्त्यांना प्रभावीपणे ताकदच दिली नाही. विशेषतः २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कोरोना प्रादुर्भावाचे कारण असू शकते.

Prashat Paricharak-Samadhan Autade
लोकसभेला व्होट आणि नोट मिळविणाऱ्या सदाभाऊंनी अनुभवला सोलापुरी हिसका!

आगामी विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीचाविचार करता आपला गट मजबूत करण्यासाठी दामाजी कारखाना निवडणुकीतील भूमिका निर्णायक ठरणार आहे. विरोधकांनी पोटनिवडणुकीत दामाजीच्या १९ हजार सभासद अपात्र केल्याचा मुद्दा आवताडे यांना खोडून काढण्यात यश आले होते. मात्र, आताही काही सभासद अपात्र केल्यावर झालेल्या तक्रारी व उच्च न्यायालय याचिकेचा विचार करता, हा विषय आमदार आवताडे कशा पद्धतीने निवडणुकीत हाताळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com