पंचायत समिती निवडणूक : विद्यमान सभापती व उपसभापतींसह अनेक दिगजांना धक्का

Pandharpur | Prashant Paricharak | पंचायत समितीवर मागील अनेक वर्षापासून माजी आमदार प्रशांत परिचारक गटाची सत्ता आहे.
Prashant Paricharak
Prashant Paricharak Sarkarnama

पंढरपूर : पंढरपूर पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीमध्ये विद्यमान सभापती अर्चना व्हरगर आणि उपसभापती प्रशांत देशमुख यांच्यासह अनेक सदस्यांचे गण आरक्षित झाल्याने विद्यमान पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. पंचायत समितीच्या २० गणांची आरक्षण सोडत आज पंचायत समितीच्या सभागृहात काढण्यात आली. यात विद्यमान सभापती अर्चना व्हरगर यांचा उंबरे पंचायत समिती गण सर्वसाधारण झाला आहे. (Pandharpur | Prashant Paricharak latest News)

शिवाय तालुक्याच्या राजकारणात महत्वाचा समजला जाणारा उपसभापती प्रशांत देशमुख यांचा कासेगाव गण ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे पंचायत समितीमध्ये जाण्याची देशमुखांची परंपरा खंडित होणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरक्षणावर येथील देशमुखांचे राजकारण अवलंबून राहणार आहे. या पंचायत समितीवर मागील अनेक वर्षापासून भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) गटाची सत्ता आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील यांचा होमपीच असलेला भोसे पंचायत समिती गण अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे विद्यमान सदस्या प्रफ्फुलता पाटील यांची संधी हुकली आहे. त्यामुळे पाटील यांनाही यावेळी पंचायत समितीच्या राजकारणापासून दूर राहावे लागणार आहे. (Pandharpur | Prashant Paricharak latest News)

गुरसाळे पंचायत समिती गण ओबीसीसाठी राखीव झाल्याने माजी सभापती राजेंद्र पाटील यांची ही संधी हुकणार आहे. तर पिराची कुरोली पंचायत समिती गण अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे विद्यमान सदस्य व माजी सभापती दिनकर नाईकनवरे यांनाही मोठा फटका बसला आहे. विद्यमान सदस्य सत्यवान देवकुळे यांचा पळशी गण ओबीसीसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे त्यांचाही पंचायत समितीत जाण्याचा मार्ग रोखला गेला आहे.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व विद्यमान पंचायत समितीचे सदस्य संभाजी शिंदे सदस्य यांचा भाळवणी गण सर्वसाधारण आहे. त्यामुळे शिंदे यांना निवडणुक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. करकंब गण पुन्हा सर्वसाधारण राहिल्याने विद्यमान सदस्य राहूल पुरवत यांना दिलासा मिळाला आहे. खर्डी पंचायत समिती गण सर्वसाधारण झाल्याने खर्डीचे माजी सरपंच प्रणव परिचारकांना येथून निवडणूक लढवण्याची संधी मिळू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com