Praniti Shinde : "जातीपातीतून निवडून आलेल्या खासदारांनी शहराचा पाणी प्रश्नही सोडवला नाही!"

Praniti Shinde : भाजपच्या माध्यमातून शहराच्या मूलभूत प्रश्नांवरही काहीच काम झाले नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.
Praniti Shinde
Praniti Shinde Sarkarnama

सोलापूर : जातीपातीचं राजकारण करून सोलापूरचे खासदार निवडून आलेले आहेत. या भाजपच्या खासदारांनी आजपर्यंत संसदेत मतदारसंघाबाबत कोणताही प्रश्न, कोणत्याही समस्या संसेदेत मांडलेल्या नाहीत. आठ वर्षात त्यांनी एक पाण्यची पापपलाईनसुद्धा टाकता आलेली नाही. शहराला भेडसवणाऱ्या पाण्याचा प्रश्न त्यांना सोडता आलेला नाही. शिंदे साहेबांच्या काळात‘एनटीपीसी’तून शहरासाठी दुहेरी पाईपलाईन कामाची मंजूर करण्यात आली होती. मात्र ती भाजप काळात पूर्ण करता आलेली नाही, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.

Praniti Shinde
Mla Shrikant Bhartiya : फडणवीसांच्या खास आमदारावर भाजपची 2024 ची जबाबदारी; नाशिकच्या कार्यकारिणीत निर्णय

काँग्रेस प्रदेशच्या कार्याध्यक्षपदी असलेल्या प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात काँग्रेसची शहरातल्या प्रभाग-२० मध्ये ‘हात से हात जोडो’ पार पडणाऱ्या अभियानाची तयारी व आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार शिंदे यांनी भाजपवर व सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर महाराज (Jay Siddheshwar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भाजपच्या माध्यमातून शहराच्या मूलभूत प्रश्नांवरही काहीच काम झाले नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Praniti Shinde
Ravikant Tupkar : आत्मदहन प्रयत्नानंतर आता पोलिस स्थानकातून तुपकरांचा अन्नत्याग : आंदोलनावर ठामच!

यावेळी संयोजक नासीर बंगाली, शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक तौफीक हत्तुरे, जुबेर कुरेशी, अंबादास करगुळे, शोहेब महागामी, नजीर नदाफ, वाहिद नदाफ, वाहिद बिजापुरे, रफीक चकोले, नासीर पठाण, दाऊद नदाफ, जावेद कुरेशी, सादिक कुरेशी, तिरुपती परकीपंडला, प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, नसरो इनामदार, असलम शेख, इलियास शेख, रजाक कादरी, गौस नदाफ, तौसीफ काझी, सन्नी देवकते, संजय गायकवाड, बाबूभाई इमरान आप्पा, साहिल रामपुरे, लतीफ शेख, दिनेश डोंगरे, महेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com