प्रणिती शिंदेंनी दिला नाना पटोलेंना पाठिंबा

सोलापूर (solapur) महापालिकेच्या परिसरात आज आय लव्ह सोलापूर सेल्फी पॉईंट उदघाटन करण्यात आले.
Praniti Shinde Latest news update
Praniti Shinde Latest news update Sarkarnama

सोलापूर : सोलापूर (solapur) महापालिकेच्या परिसरात आज आय लव्ह सोलापूर सेल्फी पॉईंट उदघाटन करण्यात आले. कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) यादेखील उपस्थित होत्या.यावेळी "आमची भूमिका तीच जी नाना पाटोलेंची आहे, नाना पटोले भाजप विरोधात आहे त्यामुळं ते विरोध करणारच, त्याबाबत त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे. (Praniti Shinde Latest news update)

- नाना पटोले-भाजप वाद

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी 'मी मोदी यांना मारू शकतो', 'शिवी देऊ शकतो' असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले होते. यानंतर पटोले यांनी आपण एका गावगुंड मोदीबाबत बोलत होतो असा दावा केला होता. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली. (Nana Patole Latest news update)

Praniti Shinde Latest news update
प्रणिती शिंदे अन् वर्षा गायकवाड यांच्यावर काँग्रेसकडून मोठी जबाबदारी

-प्रणिती शिंदेंना मोठी जबाबदारी

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (UP Election 2022) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. नेत्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यास सुरूवातही केली आहे. उत्तर प्रदेशातील स्टार प्रचारकांच्या (Star Campaigners) यादीत महाराष्ट्रातील दोन नेत्यांना स्थान मिळाले आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आणि आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशाच्या मैदानात या दोघी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मतं मागण्यासाठी जाणार आहे. या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, प्रियांका गांधी (Priyanka Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi), गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत सलमान खुर्शिद, भुपेश बघेल, राज बब्बर या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर, काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या कन्हैया कुमार यालाही स्टार प्रचारक म्हणून स्थान देण्यात आलं आहे. या यादीत सचिन पायलट, हार्दिक पटेल, भुपेंदर सिंग हुडा या नेत्यांच्या तोफाही उत्तर प्रदेशात धडाडणार आहेत. वर्षा गायकवाड यांनी याआधीही उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांच्यासोबत काम केले आहे. तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना राहुल गांधी यांच्या युवा ब्रिगेडमध्ये स्थान देण्यात आलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com