Solapur Politics : सुशीलकुमार शिंदेंप्रमाणे प्रणितींनाही हवाय थेट गांधी परिवाराशी ‘ॲक्सेस’

भविष्यातील ‘उज्ज्वल’ नेतृत्वासाठी प्रणिती यांनी साखर पेरणी सुरू केली आहे. त्याला कितपत यश मिळते, हे पाहावे लागणार आहे.
Rahul Gandhi-Praniti Shinde
Rahul Gandhi-Praniti ShindeSarkarnama

शिवाजी भोसले

सोलापूर : ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) गांधी कुटुंबीयांच्या खास मर्जीतील. सोनिया गांधींशी (Soniya Gandhi) त्यांचा थेट कनेक्ट होता, त्यामुळे शिंदे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वाधिक शक्तीशाली आणि दोन नंबरचे गृहमंत्रीपद मिळविले. तसेच लोकसभेतील नेतेपदालाही गवसणी घातली. अगदी त्याच पद्धतीने शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी आपली वाटचाल सुरू केली आहे. काँग्रेसमधील (Congress) आपली वाट निर्धोक असावी आणि भविष्यात नेतृत्वाची संधी आली तर ‘हायकमांड’चा हात डोक्यावर असावा, यासाठी प्रणिती यांनी थेट राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी संपर्क वाढविला आहे. भविष्यातील ‘उज्ज्वल’ नेतृत्वासाठी प्रणिती यांनी साखर पेरणी सुरू केली आहे. त्याला कितपत यश मिळते, हे पाहावे लागणार आहे. (Praniti Shinde also wants direct access to the Gandhi family)

खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरपर्यंत ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा सध्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच जम्मू काश्मीरमध्ये आहे. महाराष्ट्रात आलेल्या या यात्रेत सुशीलकुमार शिंदे यांच्यासह प्रणिती यांनीही सहभाग घेतला. या यात्रेदरम्यान प्रणिती शिंदे यांनी अमरावती जिल्ह्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत ‘हम साथ साथ है’ असा संदेश दिला. या यात्रेदरम्यान त्या राहुल गांधी यांच्या अत्यंत निकट राहिल्या. या यात्रेची पर्वणी साधत प्रणिती शिंदे यांनी भविष्यातील वाटचाल सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टाळून थेट गांधी परिवाराशी ॲक्सेस वाढविण्याचा प्रयत्न चालवला आहे.

Rahul Gandhi-Praniti Shinde
Sambhaji Raje News : संभाजीराजेंनी घेतली कट्टर भाजपविरोधक मुख्यमंत्र्यांची भेट : महाराष्ट्रात रंगली ‘या’ गोष्टीची चर्चा!

आमदारकीची हॅट॒ट्रीक साधणाऱ्या प्रणिती शिंदे या सध्या प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत. भविष्यात महाराष्ट्राच्या नेतृत्वाची संधी आली तर हायकमांड राहुल गांधी यांचे समर्थन पाठिशी राहावे, या अनुषंगानेच प्रणिती शिंदे यांनी भारत जोडो आपले बॉन्डिंग पक्के करण्याचा प्रयत्न केला आहे. झाला. अत्यंत चाणाक्ष आणि धोरणी प्रणिती यांनी राहुल गांधी यांच्यासमोर प्रभाव पडेल, अशाच पद्धतीने या यात्रेत शक्तीप्रदर्शन केले. यात्रेची अमरावती जिल्ह्यातील जबाबदारी चोखपणे पार पाडून त्यांनी आपली नेतृत्वगुण दाखवून दिले आहेत.

Rahul Gandhi-Praniti Shinde
Nashik Graduate Constituency : सत्यजित तांबे अडचणीत? भाजपने पाठिंबा दिल्याचा संभाजीराजेंच्या उमेदवाराचा दावा

भारत जोडो यात्रेदरम्यान वरिष्ठांकडे साखरपेरणी करणाऱ्या प्रणिती शिंदे यांना पित्याप्रमाणेच गांधी कुटुंबीयांतील पुढची पिढी असलेले राहुल गांधी कसे हात देतात, हे काळच सांगू शकेल. सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या सक्षम नेतृत्वाने दिल्लीपर्यंत यशस्वीपणे धडक मारली. अगदी लोकसभेतील काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या राजकीय प्रवासाच्या ट्रॅकवर ‘दलित चेहरा’ ही जरी जमेची गोष्ट असली होती, तरी त्यांच्या पाठीशी हायकमांड सोनिया गांधी यांचा ‘हात’ भक्कमपणे होता. तद्वतच प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी गांधी परिवाराचा खास करुन राहुल गांधी यांचा ‘हात’ राहिल्यास नेतृत्वाचा ट्रॅक सुसाट असेल, हे मात्र नक्की.

Rahul Gandhi-Praniti Shinde
India Today-C Voter Survey : देशात आठव्या स्थानी; मात्र, महाराष्ट्राच्या जनतेची पसंती मुख्यमंत्री शिंदेंना मिळेना!

मुंबई-नागपुरात भाजप नेते लागले कामाला

आमदार प्रणिती शिंदे यांनी भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील नांदेड, अकोला, अमरावती, वाशीम तसेच राजस्थानमधील अनेक भागातील यात्रेत सहभाग नोंदविला. अमरावती जिल्ह्यातील यात्रेची तर जबाबदारी स्वत:हून घेतली. याशिवाय त्या पंजाब आणि जम्मू काश्मीरमधील यात्रेत सहभागी आहेत. एकीकडे भारत जोडो यात्रेतील सहभागाचा त्यांचा झंझावात सुरु असतानाच दुसरीकडे त्यांना भाजपमध्ये घेण्याची चर्चा मुंबई अन् नागपूर येथे सुरु असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com