Satara : प्रकाश आंबेडकर म्हणतात, हे तर घोषणाबाजांचे सरकार...

गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाला Election Commission कुठलाही धाक नसल्याचे दिसून येत आहे. केंद्रातील Central अनेक यंत्रणावर दबाव असल्याने देशाची लोकशाही Democracy धोक्यात आली आहे.
Eknath Shinde, Prakash Ambedkar
Eknath Shinde, Prakash Ambedkarsarkarnama

सातारा : गेल्या काही दिवसांत राज्य सरकारकडे मोठ्याप्रमाणात निधी आला आहे. मात्र, आतापर्यंत विविध योजनांच्या केवळ घोषणा करण्यात आल्याने भाजप, शिंदे गटाचे सरकार घोषणाबाजांचे सरकार ठरले आहे. आतापर्यंत कुठेही विकासात्मक कामांना निधी दिल्याचे दिसत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी कुणाला दिला याचा खुलासा करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी साताऱ्यातील शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,‘‘ठाकरे गट व शिंदे गटाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीबाबत निर्णय दिला नाही. या निकालाबाबत अनेक मुद्दे अनुत्तरित असल्याचे दिसून येत आहे. परंतु, न्यायालयाला निवडणुक आयोगाच्या कोर्टात चेंडू टोलवायचा होता. तर एवढे दिवस वाट का पाहिली, असा प्रश्न त्यांनी केला.

Eknath Shinde, Prakash Ambedkar
शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे चुकीचा संदेश गेला : प्रकाश आंबेडकर

सद्याच्या काळात संविधानिक नसलेल्या माणसाला संविधानिक पदावर बसवल्याने अनेक निर्णय एकाधिरशाहीपणे घेतले जात असल्याने व्यवस्थेची वाट लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणुक आयोगाला कुठलाही धाक नसल्याचे दिसून येत आहे. केंद्रातील अनेक यंत्रणावर दबाव असल्याने देशाची लोकशाही धोक्यात आल्याचे सांगत त्यांनी भाजपवर टीका केली.

Eknath Shinde, Prakash Ambedkar
Rashmi Thackeray : टेंभी नाक्यावरील एकनाथ शिंदेंच्या नवरात्रोत्सवाला रश्मी ठाकरे भेट देणार

मागील काही दिवसांपासून राज्यात खोक्याचे राजकारण सुरु असून जनतेला विकासाचे राजकारण आवश्‍यक आहे. देशभरात राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु केली असून तो त्यांच्या पक्षाचा प्रश्‍न आहे. मात्र, आजपर्यंत भारत तुटलाच नाही तर जोडण्याचे काम कशासाठी करत आहेत, असा प्रश्न करून देशात भाजप लोकशाहीला मारक पक्ष आहे.

Eknath Shinde, Prakash Ambedkar
वंचित बहुजन आघाडी शिवसेनेत प्रवेश करणार : शिवसेना खासदाराचे मोठे विधान

देशभारत राष्ट्रीय तपास यंत्रणांनी पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) वर छापेमारी सुरु आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालयाला धोका असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय संस्थानी कारवाई केल्यानंतर छापा मारल्यानंतर त्यांची माहिती कुणालाही दिली जात नाही. मात्र, काही ठिकाणी पूर्ण देशाला इस्लामिक करण्याची कागदपत्रे मिळाल्याचे सांगितले जात आहे. या देशातील ८० टक्के जनता वाड-वडिलांच्या धर्माशी एकसंघ आहे. तरी देखील देशातील माणूस धर्मांतर करणार असून मुस्लिम धर्म स्विकारणार आहे हा जावई शोध एनआयने कुठून लावला याचा खुलासा करावा, असेही आंबेडकरांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in