प्राजक्त तनपुरेंवर सरकारी रुग्णालयात उपचार : केली कोरोनावर मात

मुंबईत राज्याच्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर काही मंत्री व आमदारांना कोरोनाची ( Corona ) लागण झाली.
Prajakt Tanpure

Prajakt Tanpure

Sarkarnama

अहमदनगर : मुंबईत राज्याच्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर काही मंत्री व आमदारांना कोरोनाची ( Corona ) लागण झाली. यात महाराष्ट्राचे ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांचाही समावेश होता. Prajakta Tanpure overcomes Kelly Corona: Discharge will be given in 24 hours

राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील तनपुरे यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार रोहित पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा समावेश आहे. यातील काही जणांच्या उपचाराला उद्या सात दिवस पूर्ण होत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात प्राजक्त तनपुरे यांचा कोरोना निगेटिव्ह आढळून आले आहेत. ते मुंबईतील सेंट जॉर्ज या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. प्राजक्त तनपुरे यांचा साधेपणा कोरोना उपचार काळातही दिसून आला.

<div class="paragraphs"><p>Prajakt Tanpure</p></div>
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार कोरोना पॅाझिटीव्ह!

या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली. ट्विटमध्ये तनपुरे यांनी म्हटले आहे की, डॉक्टरांच्या सल्ल्याने रोजचं रुटीन पुन्हा हळूहळू सुरू करतोय. आज बहुतेक डिस्चार्ज मिळेल. मात्र तुम्ही सर्वांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्या. शासनाने घातलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन, पोषणयुक्त आहार आणि सकारात्मक विचार आपल्याला कोरोनापासून नक्कीच दूर ठेवतील, असे त्यांनी सांगितले आहे.

तनपुरे बरे झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. काही कार्यकर्त्यांनी थेट त्यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्याचे फोटोही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in