Prajakt Tanpure : भाजपने दहा वर्षांत फक्त फोटोसेशन केलं...

खांडगाव, जोहारवाडी, मांडवे व मोहोज येथील तलावातील पाण्याचे विधिवत पाणीपूजन माजीमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांच्या हस्ते करण्यात आले.
Prajakt Tanpure News, Political News Updates
Prajakt Tanpure News, Political News UpdatesSarkarnama

तुळशीदास मुखेकर

Prajakt Tanpure : भाजपने मागील दहा वर्षांत वांबोरी चारीचे फक्त बटन दाबण्याचे व फोटोसेशन करण्याचेच काम केले. प्रत्यक्षात मात्र कोणत्याच तलावात पाणी पोहोचले नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी शेतकरी वांबोरी चारीच्या पाण्यापासून वंचित राहिले, अशी टीका माजीमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांचे नाव न घेता केली.

खांडगाव, जोहारवाडी, मांडवे व मोहोज येथील तलावातील पाण्याचे विधिवत पाणीपूजन तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे पाथर्डीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, मच्छिंद्र सावंत, अमोल वाघ, जालिंधर वामन प्रमुख उपस्थित होते.

Prajakt Tanpure News, Political News Updates
Tanpure Vs Kardile : हा तर तीन गावांना पन्नास वर्षे मागे नेणारा निर्णय...

तनपुरे म्हणाले की, आपण आमदार व मंत्री झाल्यापासून भागात पाणी तसेच वीज संकटावर मोठे काम केले असून मोठ्या प्रमाणामध्ये वांबोरी चारीच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आले आहे. विजेचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये मार्गी लावले आहेत. त्यामुळे परिसरातील जनता खूश आहे. नवीन आलेले खोके सरकार ठोस असे विकासाभिमुख काम करत नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहे. शिंदे- फडणवीस सरकारने विकासकामांना खीळ घातली असून कोट्यावधी रुपयांच्या रस्त्याच्या कामांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे या भागातील अनेक रस्त्याचे प्रश्‍न रखडले आहेत.

यावेळी तुकाराम वांढेकर, सिताराम सावंत, अनिल रांधवणे, ज्ञानेश्वर निमसे, अजय पाठक, मनोज म्हस्के, महेश लवांडे, गणेश शिंदे, सुनील लवांडे, नितीन लवांडे, रामदास जाधव यांच्यासह अनेक शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

Prajakt Tanpure News, Political News Updates
Prajakt Tanpure : कोणाला तरी खुश करण्यासाठी सुजय विखे पाटलांचे बेछूट आरोप...

नळयोजनेसाठी 155 कोटी

मिरी तिसगाव प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला 155 कोटी रुपये नव्याने मंजूर झाले असून या कामाचे लवकरच भूमिपूजन करणार असल्याचेही यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com