Prajakt Tanpure : कोणाला तरी खुश करण्यासाठी सुजय विखे पाटलांचे बेछूट आरोप...

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांच्यावर टीका केली होती.
Prajakt Tanpure News, Eknath Shinde News in Marathi, Political News Updates
Prajakt Tanpure News, Eknath Shinde News in Marathi, Political News UpdatesSarkarnama

Prajakt Tanpure : राहुरी येथे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दोन दिवसांपूर्वी नागरी सत्कार झाला होता. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांच्यावर टीका केली होती. या टीकेला माजी मंत्री तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे.

प्राजक्त तनपुरे म्हणाले की, कोणाला तरी खुश करण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बेछूट आरोप केले. कोणत्याही यंत्रणेचा गैरवापर केलेला नाही. त्यात कोणतेही तथ्य नाही. तसे असेल तर एखादे उदाहरण दाखवावे, असे जाहीर आव्हान तनपुरे यांनी खासदार विखे यांना दिले.

Prajakt Tanpure News, Eknath Shinde News in Marathi, Political News Updates
प्राजक्त तनपुरेंचे गणरायाला साकडे : गुवाहाटीवरून आलेल्या सरकारकडून जनसामान्यांना न्याय मिळू दे...

ते पुढे म्हणाले, "मतदार संघातील विविध विकास कामे करण्यासाठी शासकीय यंत्रणेचा पुरेपूर उपयोग केला. त्याचा काहींना त्रास वाटत असेल, तर मला आनंदच आहे. तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात. त्यांनी काय उद्योग केले. सत्तेत असतांना कसा गैरवापर केला. त्याचे मूर्तीमंत उदाहरण भाग्यश्री मोकाटे यांच्या रूपाने ठळकपणे समोर आहे. मोकाटे यांचा संसार उध्वस्त केला. अशांना कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही. विखे यांनी याविषयी आत्मचिंतन करावे," असे त्यांनी सांगितले.

"ऊर्जा खात्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रोहित्र बदलले. जलजीवन योजना केंद्राची असली. तरी त्यात राज्य सरकारचाही वाट आहे. नगर-मनमाड राज्यमार्गाच्या दर्जाहीन कामामुळे अनेकांचे बळी गेले. अजूनही बळी जात आहेत. त्याचा ठेकेदार कंपनीला जाब विचारला. म्हणजे पैसे मागितले असा होत नाही. तसे असेल तर सिद्ध करावे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जाऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा," अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

Prajakt Tanpure News, Eknath Shinde News in Marathi, Political News Updates
प्राजक्त तनपुरे म्हणाले, विरोधकांच्या ईडीला विकास कामांतून उत्तरे देणार...

"पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या विशाखापट्टणम रस्त्याचे काम कशामुळे रखडले. कोणी कमिशन घेतले. याचाही शोध घेण्याची वेळ आली आहे. राजकीय आयुष्यात अनेक वर्षे योगदान देणाऱ्या एखाद्यावर वैयक्तिक टीका करणे योग्य नाही. वयोमर्यादेचे भान ठेवणे गरजेचे असते. आमच्यावर चांगले संस्कार असल्याने आम्ही वयाने मोठे असणाऱ्यांवर टीका-टिपणी करण्याचे टाळतो. डॉ. सुजय विखे यांनी अधिक सविस्तर माहिती घेऊन वक्तव्य करावे. संगत चुकीच्या लोकांशी झाल्याने, चुकीची वक्तव्य होतात." असेही आमदार तनपुरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com