प्राजक्त तनपुरे म्हणाले, निळवंडेच्या कामासाठी भाजपपेक्षा तिप्पट निधी दिला

निंभेरे येथे निळवंडे कालव्याच्या बोगद्याच्या कामाची पाहणी राज्याचे नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी केली.
Prajakt Tanpure
Prajakt TanpureSarkarnama

राहुरी ( जि. अहमदनगर ) - निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. या कामाला आता गती आली आहे. निंभेरे येथे निळवंडे कालव्याच्या बोगद्याच्या कामाची पाहणी आज (सोमवारी) राज्याचे नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी केली. त्यानंतर कानडगाव येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत या कामाला भाजपपेक्षा जास्त निधी महाविकास आघाडीने दिल्याने कामाला वेग आल्याचे सांगितले. ( Prajakt Tanpure said that he gave three times more funds for Nilwande's work than BJP ) 

या कामाच्या पाहणी प्रसंगी निळवंडे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता प्रमोद माने, उप अभियंता आसिफ शेख, जिल्हा वन अधिकारी सुवर्णा माने, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाच्या तहसीलदार माधुरी आंधळे, नायब तहसीलदार पूनम दंडिले, अमोल भनगडे, रवींद्र गागरे, सुजित वाबळे, किशोर गागरे, अनिल घाडगे, सुयोग नालकर उपस्थित होते.

Prajakt Tanpure
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मला आदित्य ठाकरे यांची कीव वाटते...

मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, निळवंडे कालव्यांना भाजपने पाच वर्षांत दिलेल्या निधीपेक्षा तिप्पट निधी महाविकास आघाडी सरकारने दिला आहे. कोरानात राज्यातील सर्व विकासकामे बंद असतांना निळवंडे कालव्यांना निधी कमी पडू दिला नाही. महाविकास आघाडीच्या तीन वर्षांत निळवंडे कालव्यांच्या कामांना खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. येत्या वर्षभरात निळवंडे पाणी लाभक्षेत्रातील गावांना देण्याचा प्रयत्न आहे." असे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

मंत्री तनपुरे पुढे म्हणाले, "जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात वारंवार बैठका घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. भाजपने पाच वर्षांत 377 कोटी रुपये खर्च केले. महाविकास आघाडी सरकारने 2019-20 (256 कोटी), 2020-21 (275 कोटी), 2021-22 (360 कोटी) असे तीन वर्षांत 891 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे निळवंडे कालव्यांच्या कामाला गती मिळाली आहे. सत्तेत नसतांना आंदोलनात भाग घेतला. सत्तेत आल्यावर निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला आहे."

Prajakt Tanpure
... तर कर्जत व जामखेडमध्ये लोकशाही राहणार नाही

"राहुरी तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी पाटबंधारे, महसूल, वन खात्याच्या अधिकाऱ्यांची संयुक बैठक घेतली. तांभेरे, कानडगांव येथे वनखात्याच्या अडचणींमुळे काम थांबले आहे. तांभेरे हद्दीतील अडचणी सोडविण्यासाठी वन खात्याला सूचना दिल्या आहेत. कानडगांव हद्दीतील कामे येत्या आठवडाभरात सुरु होतील. राहुरी तालुक्यातील कालव्याचे पूल व इतर 52 पैकी 50 कामे पूर्ण झाली आहेत. निंभेरे, तुळापूर येथे ग्रामस्थांच्या मागणीनुसार आराखड्यात नसलेल्या दोन पूलांची बांधकामे पूर्ण केली," असे त्यांनी सांगितले.

Prajakt Tanpure
प्राजक्त तनपुरे म्हणाले, लवकरच भारनियमन कमी करणार

बोगद्याचे काम..!

संगमनेर व राहुरी तालुक्याला जोडणाऱ्या निंभेरे येथील निळवंडे कालव्याच्या बोगद्याचे काम येत्या 21 दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. बोगद्याची पाहणी करतांना जलसंपदा मंत्री पाटील यांचा फोन आल्याने, त्यांनी ठेकेदाराला बोगद्याचे काम तत्काळ सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राहुरी तालुक्यात पाणी येण्याचा मुख्य अडसर दूर होईल. कणगर पर्यंत कालव्याची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत." असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

निळवंडे कालव्यांच्या कामांसाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचा माझ्यापेक्षा जास्त पाठपुरावा आहे. त्यांचा जलसंपदा खात्याचा मोठा अभ्यास आहे. निळवंडे कालव्यांसाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे. 

- प्राजक्त तनपुरे, नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com